व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! मावळच्या जनतेचे केंद्रीय मंत्रिपदाचे स्वप्न होणार पूर्ण, खासदार श्रीरंग बारणे यांचे कॅबिनेट मंत्रिपद जवळपास पक्के (रिपोर्ट)

एकनाथ शिंदे यांनी आज एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या नावानिशी आपल्या पक्षाच्या पाठींब्याचे पत्र दिले. त्यामुळे आता ते एनडीए सरकारमध्ये सहभागी होणार, यात शंका नाही.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 5, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Shrirang Barne chance for ministerial post

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभा निवडणूकांचे अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर देशातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलून गेले आहे. देशात पुन्हा एकदा मोदीराज येत असल्याचे दिसत असले तरीही यावेळची मोदींची सत्ता ही एकट्या भाजपाच्या जीवावर नसून संपूर्ण एनडीएतील घटकपक्षांच्या जीवावर असणार आहे. हे चित्र मंगळवारी (दि. 4 जून) दुपारीच स्पष्ट झाले होते. त्यामुळे बुधवारी (दि. 5 जून) घाईघाईने एनडीएची बैठक दिल्लीत बोलावण्यात आली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

दिल्लीतील या बैठकीत एनडीएच्या प्रमुख घटकपक्षांनी सत्तास्थापनेसाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाची शिफारस आणि पाठींब्याचं पत्र भाजपाकडे सोपवल्याची माहिती पुढे येत आहे. अशात याच बैठकीत एनडीएतील घटकपक्षांसोबत भाजपाने जागावाटपाचीही चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. यंदा स्थापन होणाऱ्या 18व्या लोकसभेत भाजपा पूर्णतः त्यांच्या मित्रपक्षांवर अवलंबून आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना आता प्रत्येक पायरीवर घटकपक्षांचा विचार करावा लागणार आहे. एकीकडे इंडिया आघाडीने सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्याचे वृत्त पुढे आल्याने भाजपाने तातडीने एनडीएतील प्रमुख घटकपक्षांना जवळ करून कार्यभाग आटोपण्यावर जोर दिला.

कुणी किती जागा मागितल्या ?
एका रिपोर्टनुसार टीडीएमच्या चंद्राबाबू नायडू यांनी एनडीए सरकारमध्ये आपली 7 जागांची मागणी केली आहे. तर नितीश कुमार यांनी 5 जागांची अपेक्षा व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 3 जागी संधी मिळू शकते, तर चिराग पासवास यांसह मांजी यांनीही प्रत्येकी 2-2 जागांसाठी विचारणा केली असल्याचे वृत्त समोर येत आहे. ह्याबद्दल खात्रीशीर आकडेवारी अद्याप समोर आली नसली तरीही एनडीएतील घटकपक्षांचे महत्व आणि खासदारकीच्या जागा पाहता, त्यांच्या मतांचा विचार करणे आता भाजपासाठी अनिवार्य आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किमान 2 मंत्रिपद फिक्स  –
एकनाथ शिंदे यांनी आज एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या नावानिशी आपल्या पक्षाच्या पाठींब्याचे पत्र दिले. त्यामुळे आता ते एनडीए सरकारमध्ये सहभागी होणार, यात शंका नाही. परंतू 7 खासदारांच्या संख्येमुळे एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली असून त्यांच्या मागण्यांना भाजपा नजरेआड करू शकणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 3 कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा असली तरीही त्यांना 2 मंत्रिपदे मिळू शकतात, असे सांगितले जात आहे.

श्रीरंग बारणेंचे कॅबिनेट जवळपास फिक्स –
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एनडीए सरकारमध्ये 2 किंवा 3 मंत्रिपदे जरी मिळाली, तरीही निवडून आलेल्या 7 खासदारांमध्ये याबाबत मोठी स्पर्धा आहे. शिवसेनेत मंत्रिपदाचे दावेदार असणाऱ्या खासदारांत सर्वाधिक प्रबळ दावेदार हे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे आहेत, यात शंका नाही. ( Lok Sabha Result 2024 NDA government will Form Shiv Sena MP Shrirang Barne chance for ministerial post )

श्रीरंग बारणे यांची संसदेतील कामगिरी आणि विजयाची हॅटट्रीक मंत्रिपदाच्या हक्कासाठी पुरेशी आहे. मावळ लोकसभेत सलग तिसरा विजय आणि शिवसेनेची पारंपारिक जागा राखल्याने बारणे केंद्रीय मंत्रिपदासाठी शिवसेनेत प्रमुख दावेदार आहेत. यासह एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले घनिष्ठ संबंध आणि त्यांच्या बंडाला दिलेली साथ, यामुळे आप्पा बारणे केंद्रात मंत्री बनणारच, असा विश्वास बारणेंच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे मावळच्या जनतेचे केंद्रीय मंत्रिपदाचे स्वप्न यंदा पूर्ण होईल, असे चित्र दिसत आहे.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यास सज्ज, 8 जूनला शपथविधी होण्याची शक्यता, आजच करणार सत्ता स्थापनेचा दावा?
– ‘दहा वर्षांपासून मी मावळसाठी झटत आहे.. हा विकासाचा आणि विश्वासाचा विजय’, वाचा ऐतिहासिक विजयानंतर बारणेंची पहिली प्रतिक्रिया
– मावळ विधानसभेत महायुतीचा फुसका बार ! कार्यकर्त्यांना गृहित धरणं नेत्यांना भोवलं ? बारणेंना मावळात नाममात्र आघाडी
– फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेची चपराक ! मविआच्या पारड्यात मतांचं भरघोस दान, महायुतीला सुचक इशारा


dainik maval jahirat

Previous Post

“मतदारांचा कौल मान्य, निवडणूकीत जय-पराजय होतात, पण..”, मावळ लोकसभेतील पराभवानंतर संजोग वाघेरेंची प्रतिक्रिया, वाचा

Next Post

वडगाव नगरपंचायतीकडून ओढे-नाले यांची साफसफाई, पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadhaon Maval Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायतीकडून ओढे-नाले यांची साफसफाई, पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.