जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वडगाव नगरपंचायतीकडून ‘माझी वसुंधरा 4.0’ मोहिमेअंतर्गत ओढे-नाले यांची सफाई करण्यात आली. तसेच मोकळ्या जागांवर वृक्षांची लागवड करण्यात आली. वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. निकम यांनी पर्यावरणात होणारे बदल व वाढते प्रदूषण यांना आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावण्याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले. वसुंधरेला वाचविण्यासाठी प्लास्टिक वापर करू नये. जास्तीत जास्त झाडे लावावीत. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करावे. विजेची व पाण्याची बचत करावी. शक्य होत असेल तर घरीच कंपोस्ट खत तयार करून त्याचा वापर करावा. सौर पॅनेल व सौर हिटरचा वापर करावा आदी सूचना त्यांनी केल्या. ( World Environment Day 5 June Tree plantation through Vadhaon Maval Nagar Panchayat )
मानवाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा र्हास केला आहे. जंगले तोडली आहेत. प्रदूषण हे ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत ठरले आहे. ते रोखण्यासाठी निसर्गाकडे वळावे आणि त्याचे जतन करण्यास सुरूवात करावी असा सल्ला निकम यांनी दिला. यासह यापुढे हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, जंगलतोड आणि जैवविविधतेचा ऱ्हास याविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– ‘दहा वर्षांपासून मी मावळसाठी झटत आहे.. हा विकासाचा आणि विश्वासाचा विजय’, वाचा ऐतिहासिक विजयानंतर बारणेंची पहिली प्रतिक्रिया
– वसुंधरेला समृद्ध करण्याचा वसा घेतलेले रघुनाथ ढोले ! जागतिक पर्यावरण दिन निमित्त वाचा विशेष लेख । World Environment Day
– मोठी बातमी! नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यास सज्ज, 8 जूनला शपथविधी होण्याची शक्यता, आजच करणार सत्ता स्थापनेचा दावा?