व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पावसाळा सुरु होतोय ! नागरिकांनो आपले घर आणि परिसर ठेवा स्वच्छ; हिवताप – डेंग्यू सारख्या आजारांपासून करा बचाव

दरवर्षी जून महिना हा 'हिवताप प्रतिबंध महिना' म्हणून पाळला जातो. किटकजन्य आजारांमुळे दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 7, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
Dengue

Photo Courtesy : Team Dainik Maval


दरवर्षी जून महिना हा ‘हिवताप प्रतिबंध महिना’ म्हणून पाळला जातो. किटकजन्य आजारांमुळे दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो. हिवताप, डेंग्यू, चिकनगुन्या, हत्तीरोगसारखे आजार डास चावल्यामुळे होतात. असे जीवघेणे आजारांपासून दूर राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात, घरात डासांची निर्मिती होवू नये म्हणून विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

किटकजन्य आजारांचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती साचलेल्या पाण्यात होत असते. डास हा साचलेल्या पाण्यात अंडी घालतो. ८ ते १० दिवसात नवीन डास जन्माला येतो. हा डास आजारी व्यक्तीला (रुग्णास) चावल्यास रुग्णाच्या शरीरातील जंतू डासाच्या शरीरात जातात. तेथे त्यांची वाढ होते व त्यानंतर हा असा दूषित डास ज्या निरोगी व्यक्तींना चावेल त्यांना डेंग्यू, चिकनगुन्या व हत्तीरोग यासारखे आजार होतात. ( Rain Starting keep your house and surroundings clean Protect against diseases like winter fever dengue )

हिवतापाची लक्षणे :
थंडी वाजून ताप येणे हे हिवतापाचे लक्षण आहे. ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो. नंतर घाम येवून अंग गार पडते. ताप आल्यानंतर डोके दुखते व बऱ्याच वेळा उलट्याही होतात.

डास आणि त्यांच्या उत्पत्तींची ठिकाणे :
ॲनॉफिलीस डास हा हिवतापाचा प्रसार करतो. त्याची उत्पत्ती नदी, नाले, विहिरी व तळी याठिकाणच्या स्वच्छ पाणीसाठ्यांमध्ये होते. एडिस एजिप्ती हा डास डेंग्यू आणि चिकनगुन्या या आजारांचा प्रसार करतो. त्याची उत्पत्ती ही घरगुती पाण्याच्या टाक्या, बॅरल, रांजण, हौद, फुटके डबे, निरूपयोगी साठविलेले पाणी, घरातील कुलर, फ्रिजच्या डीप ट्रे मधील पाणी, मनी प्लॅन्ट मधील पाणी इत्यादी स्वच्छ पाण्यासाठ्यामध्ये होते. क्यूलेक्स डास हा हत्तीरोगाचा प्रसार करतो. त्याची उत्पत्ती शौचालयाचा सेप्टिक टँक, तुंबलेली गटारे व पाण्याची डबके या अस्वच्छ पाणीसाठ्यात होते.

अशी घ्यावी दक्षता :
ताप आल्यास त्वरीत डॉक्टरकडे जावे. डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे आवश्यक चाचण्या कराव्यात. शासकीय रुग्णालयात यासाठी मोफत औषधोपचार उपलब्ध आहेत. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरावेत. डासांपासून संरक्षणासाठी घराच्या दारे, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. क्रीम, मॅट, कॉईलचा वापर करावा.

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी करा उपाययोजना :
घराच्या शौचालयाच्या सेप्टीक टँकच्या व्हेन्ट पाईपला (गॅस पाईप) जाळी बसवावी अथवा कापड बांधावे यामुळे डासांची उत्पत्ती रोखली जाते. घर आणि परिसरात स्वच्छता ठेवावी. सेप्टीक टँकचे ढापे सिलबंध ठेवावेत. गच्चीवरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण बसवावीत. घरातील पाण्याच्या टाक्या, रांजण, बॅरल, हौद हे आठवड्यातून किमान एकदा घासून पुसून स्वच्छ करावेत व ते घट्ट झाकनाने आणि कापडाने नेहमी झाकून ठेवावेत.

  • घरातील, गच्चीवरील, घराच्या परिसरातील भंगार सामान, फुटके डबे, वस्तू, निरूपयोगी टायर यांची विल्हेवाट लावावी. या ठिकाणी पावसाचे पाणी साठून डासांची उत्पत्ती होते. घरातील कुलर, मनी प्लॉट, चायनीज प्लॉटमधील पाणी आठवड्यातून किमान एकदा बदलून स्वच्छ करून पुन्हा भरावे. फ्रीजच्या ट्रेमधील पाणी वेळोवेळी काढून टाकावे. गच्चीवर अंगणात घराच्या परिसरात कोठेही पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी.

अपर्णा पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी, पुणे – सन २०२७ पर्यंत हिवताप निर्मुलन व शून्य हिवताप रुग्ण हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हिवताप निर्मूलन कार्यक्रम नागरिकांच्या सहभागाने राबविण्यात येणार आहे. हिवताप प्रतिबंध महिना राबवित असताना नागरिकांना हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. ‘डासांची उत्पत्ती रोखूया, हिवतापाचे निर्मूलन करूया’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा.

अधिक वाचा –
– महाराष्ट्रात महाविकासआघाडीला घवघवीत यश ! वडगाव मावळ येथे मविआ कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा । Vadgaon Maval
– श्रीरंग बारणेंच्या विजयानंतर मावळात भाजपाचा जल्लोष ! वडगाव आणि तळेगाव शहरात फटाके फोडून मिठाईचे केले वाटप । Maval News
– पवना शिक्षण संकुलात ‘एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड व संवर्धन’ उपक्रमाची सुरूवात; संस्थेमार्फत 9000 झाडांची होणार लागवड । Pavananagar


Previous Post

मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक ! आमदार सुनिल आण्णांसह 5 जणांची दांडी, चर्चांना उधाण, अजितदादा म्हणाले…

Next Post

पवार कुटुंबाचा आजवर तीन वेळा पराभव, प्रत्येक पिढीने पाहिलाय एक पराभव, पाहा नावे । Pawar Family Defeat In Election

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra Pawar Family Four Generations In Politics

पवार कुटुंबाचा आजवर तीन वेळा पराभव, प्रत्येक पिढीने पाहिलाय एक पराभव, पाहा नावे । Pawar Family Defeat In Election

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.