व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘राज्यात आमचे 105 आमदार तरीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री’, प्रवीण दरेकरांनी श्रीरंग बारणेंना शेलक्या शब्दात सुनावले । Pravin Darekar criticizes MP Shrirang Barne

श्रीरंग बारणे यांनी महायुतीत असूनही उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने संतापलेल्या भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी आता बारणेंना शेलक्या शब्दात सुनावले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 12, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Shrirang-Barane-Praveen-Darekar

Photo Courtesy : Team Dainik Maval


BJP Pravin Darekar criticizes Shiv Sena MP Shrirang Barne : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे यंदाच्या लोकसभा निवडणूकीत 7 खासदार निवडून आले. 13 जागा लढवून 7 खासदार निवडून आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा विजयाचा स्ट्राईक रेट महायुतीत सर्वात चांगला आहे. असे असतानाही केंद्रीय मंत्रिपद वाटपात मात्र शिवसेनेबाबत दुजाभाव करण्यात आल्याचे सांगत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी जाहीररित्या नाराजी व्यक्त केली. श्रीरंग बारणे यांनी महायुतीत असूनही उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने संतापलेल्या भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी आता बारणेंना शेलक्या शब्दात सुनावले आहे. (  मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

महायुतीत राहून जाहीरपणे नाराजी व्यक्त करणे चुकीचे –
“महायुतीतील पक्षाच्या नेत्यांनी, प्रवक्त्यानी आतील गोष्टी जाहीरपणे न बोलता पक्षाच्या पातळीवर बोलाव्यात. जाहीर विधाने करणे टाळवीत. महायुतीत राहून अशा प्रकारची एकमेकांबाबत नाराजी व्यक्त करणे, योग्य आहे असे मला वाटत नाही. श्रीरंग बारणे व अनिल पाटील यांची नाराजी ना पक्षाकरिता, ना अजित पवारांकरिता, ना शिंदेंकरिता फायदेशीर ठरणार आहे. आज जर बारणे प्रतापराव जाधव यांच्याजागी मंत्री झाले असते, तर राज्यमंत्री पदातही समाधान आहे अशा प्रकारचे विधान त्यांचे आले असते. परंतु आपण मंत्री झालो नाही मग कुठेतरी आपला संताप, नाराजी व्यक्त व्हायला पाहिजे या भूमिकेतून हे वक्तव्य आहे” असे सांगत दरेकर यांनी बारणेंना सुनावले. ( BJP leader Pravin Darekar criticizes Shiv Sena MP Shrirang Barne after his comment on Modi cabinet )

राज्यात आमचे 105 आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री –
“आज राज्यात भाजपाचे 105 आमदार असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले. पाच वर्ष मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. म्हणजे आमच्या आकड्याला इथे काहीच किंमत नाही का?” असा सवालही प्रवीण दरेकरांनी केला. तसेच “आम्ही एका विचारधारेवर, हिंदुत्वाच्या भूमिकेवर शिंदेंसोबत युती केलेली असून त्याचे सुतोवाच खासदार श्रीकांत शिंदे यांनीही केले आहे. आम्ही जागांसाठी एकत्रित आलो नाही. तशा प्रकारची भुमिका बारणे किंवा संबंधितांनी घ्यायला पाहिजे. महायुतीतील पक्षाच्या आतील गोष्टी जाहीरपणे न बोलता पक्षाच्या पातळीवर बोलाव्यात अशी नम्र अपेक्षा असून महायुतीतील सर्व प्रवक्ते, नेत्यांकडून आहे. लोकसभेची निवडणूक संपली आहे म्हणून आता बारणे व पाटील बोलायला मोकळे झालेत. त्यांच्यासाठी आमच्या आमदार, कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम केले आहे हे त्यांनाही माहिती आहे. परंतु आपल्याला मिळाले नाही बोलले तर काय फरक पडतो, पाच वर्ष मी खासदार आहे ही त्यांची भुमिका योग्य नाही,” असे खरमरीत शब्दांत प्रवीण दरेकरांनी बारणेवर टीका केली.

काय म्हणाले होते बारणे?
“एनडीएमधील इतर घटक पक्षांचे एक-एक खासदार निवडून आले आहेत. मात्र, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले गेले. मग शिंदे गटाबाबत हा दुजाभाव का केला? एक खासदार असणाऱ्यांना मंत्रिपद द्यायचे होते, तर मग कुटुंबिायांविरोधात जाऊन महायुतीत आलेल्या अजित पवारांनीही मंत्रिपद द्यायला हवे होते. तसेच भजपाने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनाही मंत्रिपद द्यायला हवे होते,” असे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले होते.

अधिक वाचा –
– जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार । Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla
– शिंदे गटाबाबत हा दुजाभाव का ? कॅबिनेट मंत्रिपद हुकल्यानंतर खासदार श्रीरंग बारणेंची संतप्त प्रतिक्रिया । Shiv Sena Maval MP Shrirang Barne
– कान्हे-नायगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोहिणी चोपडे यांची निवड । Maval News


Previous Post

घरातील कोंबडी न सांगता विकली म्हणून पत्नीने केली बडबड, पतीची आत्म’हत्या; मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार

Next Post

जवण – तुंग मार्गावर जीवघेणे खड्डे ! वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न कधी मार्गी लागणार ? सामान्यांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Potholes on Javan to Tung road in Pawan Maval area

जवण - तुंग मार्गावर जीवघेणे खड्डे ! वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न कधी मार्गी लागणार ? सामान्यांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.