तळेगाव नगरपरिषदेकडून करण्यात आलेल्या वाढीव कर आकारणीला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नगर परिषदेच्या वाढीव कराबाबत शहरातील मालमत्ताधारकांनी मोठ्या संख्येने हरकती नोंदवल्या होत्या. तसेच अनेक पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. आमदार सुनिल शेळकेंनीही पुढाकार घेत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पत्राद्वारे दाद मागितली होती. त्यावर गुरुवारी (दि. 13) मुख्यमंत्री शिंदे यांनी नगर विकास खात्याचे प्रधान सचिव यांना तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या करवाढीस स्थगिती देऊन सुनावणी करण्याचा आदेश दिला. तळेगाव शहरवासियांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वाढीव मालमत्ता कर आकारणीबद्दल सर्वातआधी पत्रकार परिषद घेऊन आमदार सुनिल शेळके यांनी करवाढीस विरोध केला होता. त्यानंतर तळेगाव शहर भाजपाने याबद्दल निवेदन देऊन मालमत्ता करवाढीस विरोध केला होता. तसेच दाद न मिळाल्यास 18 जून रोजी मोर्चाचे आयोजन केले होते. तसेच संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनीही बुधवारी (दि. 12) नगरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी एन. के. पाटील यांना करवाढी संदर्भात घेराव घालून तीव्र विरोधाची भुमिका मांडली होती. नागरिकांच्या वाढत्या विरोधानंतर तळेगावचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी कोअर प्रोजेक्ट इंजिनियर्स अँड कन्सल्टंट कंपनीला फेर चतुर्थ वार्षिक तपासणीचा आदेश दिला होता. ( Maharashtra Government suspends Talegaon Nagar Parishad increased tax levy CM eknath shinde MLA Sunil Shelke )
पत्रकार परिषद सुरू असतानाच आला आमदार शेळकेंचा फोन –
मुख्याधिकाऱ्यांच्या निर्णयाबद्दल माहिती देण्यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी गुरुवारी (दि. १३) पत्रकार परिषद आयोजित केली होती. मुख्याधिकाऱ्यांनी फेर सर्वेक्षणाचे आदेश दिले असल्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद सुरू होती, त्याचवेळी आमदार सुनिल शेळके यांचा गणेश खांडगेंना फोन आला की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढीव मालमत्ता करासंदर्भात स्थगिती दिली असून त्याची सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत. आमदारांच्या या फोननंतर पत्रकार परिषदेत सर्वांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
अधिक वाचा –
– संस्कृती फाऊंडेशन आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्याला मदतीचा हात !
– दूषित पाणी पुरवठ्यामुळे वडगावकर नागरिकांचे आरोग्य धोक्यात ? मनसे तालुकाध्यक्षांचे स्टींग ऑपरेशन !
– महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये झाला मुलीचा जन्म, मुस्लीम कुटुंबीयांनी मुलीचे नाव ठेवले ‘महालक्ष्मी’, लोणावळा स्थानकावरील घटना