व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ही बातमी वाचा मगच लोणावळ्यात जा, ‘ती’ दुर्घटना झाली आणि सगळंच बदललं ! पर्यटनाचे नवीन नियम लागू, ‘इथे’ थेट ‘नो-एन्ट्री’

भुशी धरणाच्या मागील बाजूला आलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये 5 पर्यटक वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आणि या दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 2, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Bhushi Dam

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा शहरातील भुशी धरण परिसरात रविवारी भीषण दुर्घटना घडली. भुशी धरणाच्या मागील बाजूला आलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये 5 पर्यटक वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आणि या दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले. वरिष्ठ स्तरांवरून आलेल्या आदेशानंतर आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये लोणावळा शहरात पावसाळी पर्यटनाच्या संदर्भात काही प्रतिबंध जाहीर करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

लोणावळा शहरातील सहारा ब्रिज, सहारा ब्रिज समोरील 3 छोटे धबधबे, भूशी डॅम, भूशी डॅम येथील रेल्वे विभागाच्या गेस्ट हाऊस वरचा भाग, भुशी डॅम सांडव्याच्या डाव्या बाजूचा वरचा भाग, टायगर पॉइंट, लायन्स पोईट, शिवलिंग पॉईट इत्यादी ठिकाणी पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या गर्दीच्या पर्यटन ठिकाणामधील काही धोकादायक ठिकाणे प्रतिबंधित करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाच मत झाल्याने तसेच जिल्हाधिकारी, पुणे यांनी जबाबदारीयुक्त पर्यटन राबविणे आवश्यक असल्याच्या सुचना दिल्या गेल्या असल्याने उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले यांनी पुढीलप्रमाणे काही प्रतिबंध जाहीर केले आहे. जे दिनांक 02 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लागू असणार आहे. ( Lonavala Bhushi Dam Tourism New restrictions imposed by administration No entry after 6 PM at Lions Point Tiger Point )

असे असतील निर्बंध –
1. सहारा पुलावर वाहने पार्कींग करण्यासाठी पुर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.
2. सहारा पुलाच्या समोरच्या बाजूला असलेल्या तीन छोट्या धबधब्याच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी पूर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.
3. भुशी धरणाच्या रेल्वेच्या गेस्ट हाऊस पासून बरच्या बाजूला जाण्यासाठी गेस्ट हाऊस पासून पुर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.
4. भूशी धरणाच्या सांडव्याच्या डाव्या बाजूने चन विभागच्या जागेतून वरच्या बाजूच्या धबधब्याकडे जाण्यासाठी पुर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.
5. लायन्स पॉईट / टायगर पोईट शिवलिंग पॉईंट येथे सायंकाळी 6 वाजलेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत पर्यटकांना जाण्यास पुर्णपणे प्रतिबंधित करणेत येत आहे.

या आदेशाची पोलिस विभाग, वन विभाग, नगर पालिका रेल्वे विभाग यांनी संयुक्तरित्या अंमलबजावणी करावी. रेल्वे विभागाने गेस्ट हाऊसच्या बाजूने वर जाणाऱ्या रस्त्यावर बेरेकेटींग ची तात्काळ व्यवस्था करावी, लायन्स पॉईट, टायगर पॉईट, शिवलिंग पॉईट या ठिकाणी वन विभागाने कायमस्वरूपी वनपाल नियुक्त करण्याची व्यवस्था करावी. तसेच वरील प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारे व्यक्ती पर्यटक हे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 मधील तरतुदी नुसार कारवाईस पात्र राहील असे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

अधिक वाचा –
– कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता वृक्षारोपण केले तर त्याचा सर्वांना नक्कीच उपयोग होईल – सोमनाथ घार्गे । Raigad News
– कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे, तर मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ अभ्यंकर यांचा विजय
– मुंबई पदवीधर मतदारसंघात ॲड. अनिल परब 44 हजार 784 मते मिळवून विजयी

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी कुणी पैसे मागितले तर मला सांगा, कुणालाही पैसे देऊ नका – आमदार सुनिल शेळके

Next Post

भुशी धरण परिसरातील कारवाईला तात्पुरती स्थगिती ; स्थानिक व्यावसायिकांवर अन्याय होऊ देणार नाही – आमदार सुनिल शेळके

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Action against encroachment in Bhushi Dam area

भुशी धरण परिसरातील कारवाईला तात्पुरती स्थगिती ; स्थानिक व्यावसायिकांवर अन्याय होऊ देणार नाही - आमदार सुनिल शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.