व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

हुल्लडबाजी करणे, बंदी असलेल्या ठिकाणी जाणे भोवले ; लोणावळ्यात 48 पर्यटकांवर कारवाई । Lonavala News

भुशी धरणावर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर तीन आठवड्यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी यांनी स्वतः आदेश काढत धोकादायक पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घातलेली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 24, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
action against 48 tourists in Lonavla

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळ्यात पर्यटनाच्या नावाखाली हुल्लडबाजी करणाऱ्या आणि प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. भुशी धरण मार्गावर असलेल्या सहारा पुलाच्या पुढे असणाऱ्या तीन धबधब्यांच्या वरील बाजूस डोंगरकड्यावर जाण्यास पूर्णतः बंदी आहे. यासह लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, घुबड तलाव, भुशी धरण येथील निर्जन ठिकाणी किंवा धोकादायक धबधब्यावर, पाण्याच्या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. ( Forest department and police administration action against 48 tourists in Lonavla city area )

असे असतानाही मनाई आदेश धुडकावून धोकादायक रित्या डोंगर चढून जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या 48 पर्यटकांवर आतापर्यंत वनविभाग आणि लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

भुशी धरणावर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर तीन आठवड्यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी यांनी स्वतः आदेश काढत धोकादायक पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घातलेली आहे. यातच सहारा पुलाच्या समोरच्या बाजूला असलेल्या तीन छोट्या धबधब्याच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी पूर्णवेळ तसेच इतर काही पर्यटन स्थळांवर ठिकाणी जाण्यास सायंकाळी 6 नंतर पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात आला आहे.

  • पोलिस, वनखाते फलक लावून, लाऊडस्पीकरवरून तशा सूचना पर्यटकांना देत असतात. मात्र तरीही या सुचनांकडे कानाडोळा करून अनेक अतिउत्साही पर्यटक नको ते धाडस करायला जातात. त्यामुळे आता या अशा नाठाळ पर्यटकांवर थेट कारवाई करण्याचे पाऊल पोलीस प्रशासन आणि वनखात्याने उचलले असून भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 223 प्रमाणे या पर्यटकांवर कारवाई केली जात आहे.

मागील आठवड्यात 17 पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारल्या नंतर लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक मार्गदर्शनाखाली तसेच लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली वरील प्रतिबंधित क्षेत्रात आढळून आलेल्या पर्यटकांवर या आठवड्याच्या शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीनही दिवस सलग कारवाया करण्यात आल्या. शुक्रवारी 24, शनिवारी 5 तर रविवारी 2 अशा एकूण 31 जणांवर कारवाई करण्यात आली.

अधिक वाचा –
– शिळींब सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी भगवान दरेकर ; चेअरमन, व्हाइस चेअरमन पदाधिकाऱ्यांची देखील बिनविरोध निवड । Maval News
– पवना धरण 50 टक्के भरले ! मावळवासियांसह पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी । Pavana Dam Rain Updates
– मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस, मुख्यमंत्र्यांकडून एक मागणी मान्य


dainik maval jahirat

Previous Post

आरोपींना फाशी द्या, पीडित कुटुंबाला न्याय द्या ! मावळातील तिहेरी हत्याकांडाचा मुस्लीम समाजाकडून निषेध, प्रशासनाला निवेदन

Next Post

पवनमावळ भागातील 186 विद्यार्थ्यांना मिळाला डिजिटल गुरु, रोटरी क्लब मावळकडून स्टडी ॲपचे मोफत वाटप । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
study app to class 10th students

पवनमावळ भागातील 186 विद्यार्थ्यांना मिळाला डिजिटल गुरु, रोटरी क्लब मावळकडून स्टडी ॲपचे मोफत वाटप । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.