व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात प्रथम ; राष्ट्रीय लोक अदालतीत १ लाखाहून अधिक दावे निकाली । Pune News

पुणे जिल्ह्याने राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनादरम्यान दावे निकाली काढण्यात अग्रेसर राहण्याची परंपरा कायम राखली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 30, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Lok-Adalat

File Image


Dainik Maval News : पुणे जिल्ह्यात प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ३३ हजार ६९५ प्रलंबित आणि ६६ हजार ८२२ वादपूर्व असे एकूण १ लाख ५१७ दावे निकाली काढून पुणे जिल्ह्याने राज्यात पुन्हा एकदा प्रथम स्थान पटकावले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

लोक अदालतीमध्ये बँकेचे कर्जवसूली २ हजार ७८०, तडजोड पात्र फौजदारी २५ हजार ९४७, वीज देयक १०१, कामगार विवाद खटले १००, भुसंपादन ४८, मोटार अपघात दावे न्यायाधिकरण १३१, वैवाहिक विवाद ११३, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्ट ३ हजार ४८, इतर दिवाणी ८७५, महसूल ७ हजार ५३७, पाणी कर ५४ हजार ७८ आणि इतर ५ हजार ७५९ प्रकरणे अशी एकूण १ लाख ५१७ प्रकरणे निकाली काढण्यात आले आहेत. ( More than 1 lakh claims were settled in Pune district in National Lok Adalat )

तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या २ लाख ८० हजार ९६८ दाव्यापैकी १ लाख ५१७ दावे निकाली काढण्यात येऊन ४१९ कोटी २ लक्ष ४९ हजार ८३३ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. वादपूर्व १ लक्ष ८२ हजार ११५ प्रलंबित प्रकरणांमधून ६६ हजार ८२२ प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि यात ९० कोटी ६९ लक्ष ३८ हजार ८३३ तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. तर प्रलंबित ३ लाख ३० हजार ५८८ प्रकारणांपैकी ९८ हजार ८५३ सुनावणीसाठी घेण्यात आले. त्यातील ३३ हजार ६९५ प्रकरणे निकाली काढून ३२८ कोटी ३३ लक्ष ११ हजार ५० तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

अशाप्रकारे पुणे जिल्ह्याने राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनादरम्यान दावे निकाली काढण्यात अग्रेसर राहण्याची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले आहे, अशी माहिती विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सोनल पाटील यांनी दिली आहे.

“लोक अदालतीच्या माध्यमातून न्याय तात्काळ मिळतो. पैसा आणि वेळेची बचत होते. लोक अदालतीचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कोर्ट फी ची रक्कम परत मिळते. परस्पर संमतीने निकाल होत असल्यामुळे एकमेकातील द्वेष वाढत नाही आणि कटूताही निर्माण होत नाही. त्यामुळे लोक अदालतीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.”
– श्रीमती सोनल पाटील, विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर

अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील धरणांची सद्यस्थिती काय, कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा? वाचा एका क्लिकवर । Pune News
– उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती, वृक्ष लागवड आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान । Lonavala News
– मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 : ‘या’ शेतकऱ्यांना वर्षभर मिळणार मोफत वीज, वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

आमदार सुनिल शेळके यांनी घेतली ‘तालुकास्तरीय आढावा बैठक’, ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा

Next Post

टाकवे बुद्रुक येथून अपहरण झालेल्या ‘त्या’ अल्पवयीन मुलीचा शोध लागला, तीन आरोपी ताब्यात, वडगाव मावळ पोलिसांची कामगिरी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon-Maval-Police-Station

टाकवे बुद्रुक येथून अपहरण झालेल्या 'त्या' अल्पवयीन मुलीचा शोध लागला, तीन आरोपी ताब्यात, वडगाव मावळ पोलिसांची कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.