व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 : ‘या’ शेतकऱ्यांना वर्षभर मिळणार मोफत वीज, वाचा सविस्तर

शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने 25 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024’ अंमलात आणले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 28, 2024
in महाराष्ट्र, मावळकट्टा
Farmer Farm Farm Pump Free Electricity

Photo Courtesy : Team Dainik Maval


जागतिक हवामानातील बदल आणि पर्जन्यमानातील अनियमितेमुळे राज्यातील कृषी व्यवसायावर होणाऱ्या विपरीत परिणामापासून शेतकरी बांधवांना वाचविण्यासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशील व कटिबद्ध आहे. याच अनुषंगाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने 25 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024’ अंमलात आणले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या वेळी 10/8 तास किंवा दिवसा 8 तास थ्री फेज वीजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्यासाठी शासनाने राज्यातील 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार आहे. यासाठी साधारण 14 हजार 760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ( Baliraja Free Electricity Yojana 2024 farmers will get free electricity throughout the year read in detail )

योजनेचा कालावधी : ही योजना पाच वर्षांसाठी म्हणजेच एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु 3 वर्षांच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
पात्रता : राज्यातील 7.5 अश्वशक्ती पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील.

योजनेची अंमलबजावणी : एप्रिल 2024 पासून 7.5 अश्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. शासनास विद्युत अधिनियम 2003, कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर या वीजदर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रीम स्वरुपात वर्ग करण्यात येईल.

सध्या देण्यात येणारी वीजदर सवलत रुपये 6 हजार 985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7 हजार 775 कोटी असे वार्षिक वीजदर सवलती पोटी प्रतिवर्षी रु. 14 हजार 760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येणार आहेत. या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल. तसेच मागेल त्याला सौर कृषिपंप देण्याचे धोरणदेखील शासनाकडून ठरविण्यात आले आहे. ही योजना राबविण्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण कंपनीची असणार आहे.

अधिक वाचा –
– कार्ला – मळवली दरम्यानचा रस्ता वाहतूकीसाठी बंद, वेहेरगांव मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी । Pune News
– आदर्श केंद्र शाळा कान्हे येथे ‘गुरुपूजन’ सोहळा उत्साहात । Maval News
– सासूने आपल्यावर तंत्र-मंत्र केल्याचा सुनेचा आरोप, विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला उदंड प्रतिसाद ; महिन्याभरात 1 कोटी महिलांकडून ऑनलाईन अर्ज दाखल

Next Post

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती, वृक्ष लागवड आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Uddhav Thackeray birthday Lonavala

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती, वृक्ष लागवड आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.