व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागताची तळेगावमध्ये जय्यत तयारी ; अजित पवारांच्या उपस्थितीत साजरे होणार रक्षाबंधन

राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागताची तळेगावमध्ये जय्यत तयारी ; अजित पवारांच्या उपस्थितीत साजरे होणार रक्षाबंधन

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 16, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागताची तळेगावमध्ये जय्यत तयारी ; अजित पवारांच्या उपस्थितीत साजरे होणार रक्षाबंधन

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा येत्या शुक्रवारी (16 ऑगस्ट) तळेगावमध्ये येत आहे. या यात्रेदरम्यान अजितदादा प्रामुख्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ तसेच अन्य शासकीय योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधणार आहे. जन सन्मान यात्रेच्या स्वागतासाठी संपूर्ण शहरात जय्यत तयारी सुरु आहे. अजितदादांच्या जन सन्मान यात्रेची सुरुवात नाशिकमध्ये झाली. त्यानंतर नगर जिल्ह्यातून ही यात्रा पुणे जिल्ह्यात प्रवेश करेल. ( ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) )

उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या स्वागतासाठी तळेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. जन सन्मान यात्रा तळेगाव येथे सकाळी नऊ वाजता मारुती मंदिर चौकाजवळील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे शाळेच्या मैदानावर येणार आहे. पावसामुळे गैरसोय होऊ नये म्हणून त्या ठिकाणी भव्य मंडप उभारण्यात येत आहे. कार्यक्रम स्थळी येणाऱ्या रस्त्यांवर भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा पक्षाचे झेंडे लावून जोरदार वातावरण निर्मिती करण्यात येत आहे.

  • राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध लोकोपयोगी योजना, जनहितासाठी घेतलेले निर्णय याची माहिती अजितदादा या जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने जनतेला देणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी भगिनींशी संवाद साधून आढावा घेणार आहेत. शेती पंपांवरील वीज बिल माफी तसेच मावळातील पर्यटन, कृषी पर्यटनाला कशी गती मिळेल याबाबत अजितदादा मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती शेळके यांनी दिली.

जन सन्मान यात्रेबरोबरच रक्षाबंधनही – मावळ तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 50 हजारांहून अधिक माता-भगिनींनी नावनोंदणी केली. या योजनेचा लाभ तालुक्यातील किमान 80 हजार भगिनींना मिळाला पाहिजे,हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून आपले प्रयत्न सुरू आहेत. या सर्व भगिनींनी कार्यक्रमाला येऊन अजितदादांना राखी पौर्णिमेनिमित्त भेट द्यावी, असे आवाहन आमदार शेळके यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे तालुक्यातील महिलांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने रक्षाबंधनाचा कार्यक्रम देखील होणार आहे. या कार्यक्रमात तालुक्यातील हजारो भगिनी सहभागी होणार असून अजितदादा व आमदार शेळके यांना प्रतिनिधिक राखी बांधून आभार व्यक्त करणार आहेत.

अधिक वाचा –
– राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटी 35 लाख 22 हजार महिला पात्र ; अद्याप अर्ज न केलेल्या महिलांनी ‘हे’ काम नक्की करा

– पीएम-किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 1 हजार 698 कोटी 70 लाख रुपये जमा
– मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय, लाखो नागरिकांना होणार लाभ


Previous Post

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 77 वा वर्धापन दिन समारंभ, जाणून घ्या ध्वजारोहणाची वेळ । Indian Independence Day

Next Post

वडगावातील मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहा आदिवासी कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
caste certificates to tribal families

वडगावातील मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहा आदिवासी कुटुंबीयांना जातीचे दाखले वाटप । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.