Dainik Maval News : लोणावळा येथील ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल अँड जुनिअर कॉलेज येथे रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत शिवदुर्ग मित्र संस्थेच्या शिलेदारांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. लोणावळा येथील शिवदुर्ग संस्था अनेक वर्षांपासून बचाव कार्य क्षेत्रात कार्यरत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शिवदुर्ग मित्र प्रामुख्याने शिवदुर्ग रेस्क्यू टीम, शिवदुर्ग ॲनिमल रेस्क्यू, शिवदुर्ग फिटनेस, शिवदुर्ग क्लांयंबिग, शिवदुर्ग सांस्कृतिक विभाग, शिवदुर्ग सायकलिंग माध्यमातून कार्य करत जाते. जंगलात, किल्ल्यावर, डोंगर दऱ्यामध्ये फिरताना वाट चुकलेल्या लोकांना मदत करणे, जंगलात जखमी झालेल्या लोकांना रेस्कु करणे, दरीत पडून मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढणे, अशी बचावाची कामे टीमकडून केली जातात. ( Raksha Bandhan by tying rakhi to members of Shivdurg Mitra Lonavla Sanstha )
आजवर शिवदुर्ग मित्रने विविध रेस्कू ऑपरेशन राबविले आहे. तसेच सदस्यांकडून मावळ तालुक्यात अनेक सामाजिक कामेही केली जातात. पाण्यात बुडालेले मृतदेह, धबधब्यातुन वाहून गेलेले मृतदेह शोधणे व बाहेर काढणे असे काम संस्था विनामूल्य संपूर्ण महाराष्ट्रात करत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना आजवर विविध संस्थाचे पुरस्कार मिळाले आहेत.
अधिक वाचा –
– मोनिका अंकुश कचरे-पाटील यांची महिला पोलीस पाटील संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड । Pune News
– पवनानगर परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय – निमशासकीय कार्यालये, गड-किल्ले येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
– तळेगावनंतर अजित पवारांची लोणावळ्यात जनसंवाद सभा, नागरिकांसोबत साधला संवाद, मनोगतात केला महत्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख