व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव येथील जनसन्मान यात्रेत आमदार सुनिल शेळके यांचे भावनिक भाषण, वाचा संपूर्ण भाषण । MLA Sunil Shelke

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे शुक्रवारी (दि. 16 ऑगस्ट) रोजी तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथे उत्साहात स्वागत करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 18, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
MLA Sunil Shelke emotional speech

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे शुक्रवारी (दि. 16 ऑगस्ट) रोजी तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त मावळ तालुक्यातील महिलांनी यावेळी विक्रमी गर्दी केली होती. सभास्थानी जागा अपुरी पडल्यामुळे बाहेरचे रस्ते देखील महिलांच्या गर्दीने फुलून गेले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे पाटील शाळेच्या भव्य मैदानावर झालेल्या या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध समाज घटकातील महिलांनी अजितदादांना प्रतिनिधिक राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी महिला भगिनींचा प्रतिसाद पाहून आमदार सुनिल शेळके भावूक झाले. ( Ajit Pawar Jan Samman Yatra Maval Taluka Talegaon Dabhade MLA Sunil Shelke emotional speech )

आमदार सुनिल शेळकेंच्या डोळ्यात पाणी –
आमदार सुनिल शेळके यांनी विक्रमी संख्येने उपस्थित राहिलेल्या भगिनींविषयी आपल्या प्रास्ताविकात कृतज्ञता व्यक्त केली. त्यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी उठून आमदार शेळके यांच्या पाठीवर थाप मारत त्यांना सावरण्यासाठी मदत केली. मावळच्या जनतेने साडेचार वर्षांपूर्वी माझ्यावर विश्वास ठेवला,तो मी सार्थ करुन दाखवला, असे नमूद करत आमदार शेळके यांनी तालुक्यात केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.

अजित पवार यांनी पिंपरी- चिंचवडचा आणि बारामतीचा कायापालट केला, पण दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला, याची सल मनाला अजूनही बोचते, अशी खंत शेळके यांनी व्यक्त केली. अजितदादांनी मावळसाठी खूप काही केले आहे. आणि मावळची जनता त्याची नक्की जाण ठेवील. मावळची जनता विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणारी नाही, अशी ग्वाही शेळके यांनी दिली. मावळच्या विकासासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे असे कळकळीचे आवाहनही शेळके यांनी यावेळी केले. जनसन्मान यात्रा व रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी मंगळागौरीच्या खेळांचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले होते.

अधिक वाचा –
– शिवदुर्ग मित्रच्या शिलेदारांना विद्यार्थीनींनी बांधली राखी । Lonavala News
– शेतीपंपाला मोफत वीज मिळवून देणारी राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना’ – जाणून घ्या सविस्तर
– बालेवाडी येथे महिलांच्या अलोट उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ । Pune News


Previous Post

तळेगाव दाभाडे येथे बांधकाम कामगार संघटनेचा मेळावा संपन्न ; आमदार शेळकेंनी जाणून घेतल्या कामगारांच्या समस्या

Next Post

अखिल मारवाडी महिला संघटनेच्या वतीने खंडाळा येथील अंध वृद्धांना राखी बांधत रक्षाबंधन साजरे । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Raksha Bandhan

अखिल मारवाडी महिला संघटनेच्या वतीने खंडाळा येथील अंध वृद्धांना राखी बांधत रक्षाबंधन साजरे । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.