व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रक्षाबंधनाच्या दिवशी तळेगावातील मायलेकींनी केलेल्या कृतीची सर्वत्र होतीये चर्चा ! आमदार सुनिल शेळकेंनीही केले कौतूक – पाहा व्हिडिओ

सध्या देशात कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराचे प्रकरण प्रचंड गाजत आहे. सोबतच काल परवा घडलेलं बदलापूर येथील दोन चिमुकलींवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 20, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, व्हिडिओ, शहर
Pooja Jaganade Swara Jaganade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : सध्या जवळपास प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन आला आहे. स्मार्टफोनमुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापराचे प्रमाण देखील वाढले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा अतिवापर हा तसा धोकादायकच. परंतु योग्यरितीने जर या प्लॅटफॉर्म्सचा वापर केला, तर त्यातून खुप काही चांगल्या गोष्टी करता येऊ शकतात. तळेगाव दाभाडे येथील जगनाडे मायलेकींनी देखील आपल्या कृतीतून हे करून दाखविले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )  

सध्या देशात कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराचे प्रकरण प्रचंड गाजत आहे. सोबतच काल परवा घडलेलं बदलापूर येथील दोन चिमुकलींवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे आहे. समाजातील या गंभीर घटना पाहून तळेगाव दाभाडे शहरातील पुजा अमोल जगनाडे यांचे मन व्यथित झाले. समाजातील प्रत्येक घटकाला या गोष्टींचा विचार करून त्याबद्दल व्यक्त करायला लावले पाहिजे, यासाठी जनजागृती करायला पाहिजे, असे त्यांनी ठरविले आणि त्यातूनच त्यांना एक कल्पना सुचली.

सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या संख्येने नागरिक जोडलेले आहेत. इन्स्टाग्रामवरील रिल्स पाहण्यात वेळ कसा जातो हे कुणाच्याही लक्षात येत नाही. पुजा जगनाडे यांनी इन्स्टाग्रामवर एक समाज प्रबोधन करणारा व्हिडिओ टाकण्याचे ठरविले. काल, सोमवारी रक्षाबंधन हा सण होता. या सणाचे औचित्यसाधून त्यांनी एका फलकावर समाजमनाचा ठाव घेणार संदेश लिहिला. “जसं स्वतःच्या बहिणीचं रक्षण करणं आपली जबाबदारी आहे. तसंच दुसऱ्यांच्या बहिणीचं भक्षकांपासून रक्षण करणे आपले कर्तव्य आहे… हो ना ?” असा संदेश असलेला फलक घेऊन पुजा अमोल जगनाडे आणि त्यांची लेक स्वरा अमोल जगनाडे या दोघीही तळेगाव दाभाडे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभ्या राहिल्या.

चौकातून जाणारे येणारे हजारो लोक हा फलक आणि मायलेकींना पाहून थांबत होते. वाचत होते, विचार करत होते आणि तेव्हाच पुजा यांना आपली कृती सफल झाल्याचे समाधान लाभले. यानंतर आमदार सुनिल शेळके यांचीही त्यांनी भेट घेऊन त्यांना राखी बांधली. यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी या दोन्ही माय लेकींच्या उपक्रमाचे कौतूक केले. सोबतच पुजा जगनाडे यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. समाजातील सध्याची परिस्थिती पाहता, प्रत्येकानेच मुलींच्या संरक्षणासाठी पुढे आले पाहिजे, याकरिता विचार करायला लावणारा उपक्रम राबविल्याबद्दल पुजा जगनाडे आणि त्यांच्या लेकीला टीम ‘दैनिक मावळ’चा सलाम. ( Pooja Jaganade Swara Jaganade Mother Daughter Public awareness about violence against girls Talegaon Dabhade )

पाहा व्हिडिओ –

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝓜𝓪𝓾❣️ (@swara_jagnade)

 

View this post on Instagram

 

A post shared by @pooja_jagnade942

अधिक वाचा –
– येळसे येथील प्राथमिक शाळेत मावळ तालुक्यातील पहिला स्किल स्कूल शाळा प्रकल्प सुरू । Pavananagar News
– लोणावळ्यासह मावळ तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांनी सुरक्षित पर्यटनाला प्राधान्य देणे गरजेचे : आयपीएस सत्यसाई कार्तिक । Lonavala News
– शिष्यवृत्ती परीक्षेतील चमकदार कामगिरीसाठी कान्हे शाळेतील विद्यार्थी हिंदूराज कुटे याचा जिल्हास्तरावर गौरव । Maval News


Previous Post

एकविरा विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता सांस्कृतिक वाद्य साहित्यांची भेट । Karla News

Next Post

साताऱ्यातील ‘हे’ गाव ठरले महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम, काय आहे गावाचे वैशिष्ट्ये? नक्की वाचा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Manyachiwadi village in Satara

साताऱ्यातील 'हे' गाव ठरले महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम, काय आहे गावाचे वैशिष्ट्ये? नक्की वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Panchayat-Samiti-Maval

मावळ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची सोमवारी होणार निवड ; ‘या’ दोन नावांवर शिक्कामोर्तब

March 7, 2026
Cemetery facilities will be set up from District Planning Committee DPC funds

जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून स्मशानभूमींच्या सुविधा उभारण्यात येणार

March 7, 2026
UPSC Civil Services Exam 2025 results declared more than sixty candidates from Maharashtra successful see results

शाब्बास !! ‘यूपीएससी’चा नागरी सेवा परीक्षा 2025 चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी – पाहा निकाल

March 7, 2026
What exactly did Pune district get in budget presented by Chief Minister Devendra Fadnavis Find out

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 7, 2026
Talegaon Dabhade Municipal Council threatens punitive action against those who throw garbage in open

Talegaon Dabhade : उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून दंडात्मक कारवाईचा बडगा

March 6, 2026
bjp-party-flag

मावळ भाजपाचा मोठा निर्णय ; सर्वोच्च अधिकार असलेली कोअर कमिटी बरखास्त, युवा नेतृत्वाकडे देणार सुत्र

March 6, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.