व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत लोणावळा शहराबाबत अनेक मोठे निर्णय – एका क्लिकवर वाचा सर्व निर्णय

शहरात ऑनलाइन टॅक्सींना बंदी, भांगरवाडी ते नांगरगाव रेल्वे उड्डाणपुलासाठी 15 कोटी, पाणीपुरवठा - रस्ते वाहतूककोंडी बाबत उपाययोजना

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 21, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
DCM Ajit Pawar took many major decisions regarding Lonavala city

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात लोणावळा शहरातील विविध समस्यांबाबत मंगळवारी (दि. 20 ऑगस्ट) आढावा बैठक घेण्यात आली. मागील आठवड्यात शुक्रवारी (दि.16 ऑगस्ट) लोणावळा शहरात झालेल्या संवाद बैठकीत अजित पवार यांनी शहरातील समस्यांबाबत विशेष बैठक घेण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार मंगळवारी मंत्रालयात ही बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत लोणावळा-खंडाळा शहरासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )  

या बैठकीला मावळचे आमदार सुनिल शेळके, लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेविका शादानभाभी चौधरी, मिलिंद भालेराव, विशाल मराठे, मुकेश परमार, जीवन गायकवाड, दिलीप गुप्ता, मंगेश आगरवाल, भरत हरपुडे, संदीप कोराड, वसंत काळोखे, दत्ता येवले, योगेश गवळी, अमोल शेडगे,संजय मावकर,संजय सोनवणे,नंदकुमार चोरडिया, गणेश चव्हाण,रमेश म्हाळसकर,नितेश जाधव, आनंद सदावर्ते यांसह इतर स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. ( meeting chaired by DCM Ajit Pawar took many major decisions regarding Lonavala city read all )

तसेच सदर बैठकीस गृहनिर्माण, नियोजन विभाग, सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्योग उर्जा व कामगार विभाग या विभागांचे अप्पर मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे सचिव, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी पुणे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड यांसह संबंधित विभागाचे सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

लोणावळ्यात ऑनलाईन टॅक्सी व्यवसायाला बंदी –
ऑनलाईन टॅक्सी (ओला/उबेर इ.) यांना लोणावळा शहरामध्ये व्यवसाय करण्यास पुर्णपणे बंदी करण्यात आली असून याबाबतचे निर्देश अजित पवार यांनी बैठकीत दिले. त्यामुळे लोणावळा शहरातील स्थानिक रिक्षा व टॅक्सी चालकांना दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश मिळाले आहे.

रेल्वे उड्डाणपुलासाठी निधी मिळणार –
लोणावळा शहरातील भांगरवाडी ते नांगरगाव दरम्यानच्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम मार्गी लावण्यासाठी भूसंपादनाकरीता वित्त विभागाकडून सुमारे १५ कोटी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. तसेच जोडरस्त्याचे काम देखील तातडीने करण्याबाबतचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. यासह इंदिरा वसाहतीकडे जाणारा रस्ता करण्यास पोलीस विभागाकडून परवानगी देऊन तात्काळ रस्ता करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

स्थानिकांच्या रोजगारासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश –
लोणावळा-खंडाळा परिसरात लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात. या पर्यटकांवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांवर मध्यतंरी कारवाई करण्यात आली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेनंतर भुशी डॅम परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

  • वाहतूक कोंडी आणि पाणीपुरवठ्याबाबत निर्णय
    लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या जाणून घेत जुना मुंबई-पुणे महामार्ग रुंदीकरणाच्या कामासाठी नगरपरिषदेकडून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले आहेत. तसेच नगरपरिषद हद्दीतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या जागेत पाण्याच्या टाकीसाठी तात्काळ जागा उपलब्ध करुन देण्याचे आदेश संबंधित विभागास देण्यात आले आहेत.

यासह लोणावळा नगरपरिषदेत अनुकंपा तत्त्वावरील नोकरी उपलब्ध होण्यासाठी मुंबई येथे सादर केलेल्या प्रस्तावातील कागदपत्रांची पुढील आठ दिवसात छाननी करुन तात्काळ अनुकंपावरील बांधवांना नोकरीची संधी देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश अजित पवारांनी दिले आहेत. लोणावळा शहरातील सांडपाणी समस्या सोडविण्यासाठी पीएमआरडीए मार्फत एकूण ९ ठिकाणी एसटीपी प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या परवानगीसाठी पाठविण्यात आलेला आहे, त्या प्रस्तावास मंजुरी मिळणेसाठी संबंधितांना निर्देश दिले असुन सदर कामास गती देण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले आहेत.

अधिक वाचा –
– साताऱ्यातील ‘हे’ गाव ठरले महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम, काय आहे गावाचे वैशिष्ट्ये? नक्की वाचा
– रक्षाबंधनाच्या दिवशी तळेगावातील मायलेकींनी केलेल्या कृतीची सर्वत्र होतीये चर्चा ! आमदार सुनिल शेळकेंनीही केले कौतूक – पाहा व्हिडिओ
– एकविरा विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता सांस्कृतिक वाद्य साहित्यांची भेट । Karla News


Previous Post

मोठी बातमी ! लोणावळा शहरात ‘ओला’ ‘उबर’ सारख्या ऑनलाईन टॅक्सींना व्यवसायासाठी बंदी, मंत्रालयातील आढावा बैठकीत निर्णय । Lonavala News

Next Post

पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई ! घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील मुख्य आरोपीला अटक, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pimpri police

पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई ! घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील मुख्य आरोपीला अटक, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.