Dainik Maval News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णकृती पुतळा बसविण्यात आला होता. सदर पुतळ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ह्या घटनेने राज्यभर संतापाची लाट निर्माण झाली असून महायुती सरकारवर टीका केली जात आहे. मावळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार विक्रम देशमुख यांना याबाबत निवेदन दिले आहे. ( Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Maval Taluka Shiv Sena UBT Statement to Tehsildar )
यावेळी तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, संघटक शांताराम भोते, संघटक अमित कुंभार, यशवंत तुर्डे, भारत ठाकूर, युवासेना प्रमुख उमेश गावडे, बाळासाहेब शिंदे, सतीश गरुड, युवराज सुतार, विभागप्रमुख भरत भोते, उमेश दहिभाते, गणेश लष्करी, राहुल नखाते, भरत वाटाणे, सचिन ढोरे, रंगनाथ सावंत, संतोष ढोरे, अजय भोसले, शंकर गोपाळे, कचरू गराडे, शरद ओझरकर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मुंबईतील गोविंदा पथकाने फोडली ‘मावळ गर्जना’ प्रतिष्ठानची दहीहंडी । Vadgaon Maval
– सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी संतोष भेगडे यांची पोलिसांत धाव, तक्रार अर्जात अनेकांची नावे । Talegaon Dabhade
– ‘त्याच ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार