व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! इंदोरीच्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना मिळणार 68 कोटींचा अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road News

आमदार शेळके यांनी मिळवून दिला शेतकऱ्यांना न्याय ; विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी पाळला शब्द

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 10, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Pune-Ring-Road

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या नियोजित रिंग रोडमध्ये बाधित होत असलेल्या मावळ तालुक्यातील इंदोरी येथील शेतकऱ्यांना दीडपट मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त 68 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आमदार सुनिल शेळके यांनी पाठपुरावा करून इंदोरीतील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. आमदार शेळके यांच्या निवासस्थानी इंदोरीच्या शेतकऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार व जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी संपादित जमिनींचा अतिरिक्त मोबदला देण्याचा शब्द शेतकऱ्यांना दिला होता.त्या संदर्भातील आदेश काढून त्यांनी आपला शब्द पाळला आहे.

उपविभागीय (प्रांत) अधिकारी सर्व संबंधित जमीन मालक शेतकऱ्यांना नव्या मोबदल्याबाबत उल्लेख असलेल्या नोटिसा बजावून त्यांच्याकडून त्यासाठी संमती पत्र घेऊन या नव्या निर्णयाची अंमलबजावणी करतील, अशी माहिती आमदार शेळके यांनी दिली. इंदोरीच्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्याबरोबरच रिंग रोडच्या भूसंपादनाचे काम मार्गी लागून त्या कामास गती प्राप्त होईल, असे शेळके यांनी सांगितले.

शासनाकडून यापूर्वी जाहीर करण्यात आलेला संपादित जमिनीचा मोबदला हा अपुरा असल्यामुळे तो वाढवून मिळण्याबाबत आम्ही आमदार सुनिल शेळके यांच्याकडे मागणी केली होती. त्याचा प्रशासनाकडे व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून आमदारांनी आम्हाला न्याय मिळवून दिला. त्याबद्दल आम्ही आमदार शेळके तसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया इंदोरीच्या शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.

याबैठकीस अरविंद शेवकर, नंदकुमार ढोरे, सरपंच शशिकांत शिंदे, उपसरपंच स्वप्निल शेवकर, ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ ढोरे, संदीप शिंदे, रोहन शिंदे व रिंग रोड बाधित शेतकरी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– राज्यातील अंगणवाडी केंद्रांना सोलर सिस्टिम देणार, शिंदे सरकारचा निर्णय, 36 हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार
– कामशेतमधील मुस्लीम दफनभूमीस संरक्षण भिंत बांधण्यासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध । Kamshet News
– लोणावळा नगर परिषद हद्दीतील विविध विकासकामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन । Lonavala News


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच, पवना धरणाने गाठली शंभरी, लोणावळ्यात आतापर्यंत ५४७७ मीमी पाऊस

Next Post

शिरे येथील रस्त्याचा भूमिपूजन समारंभ संपन्न, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
funds available through MLA Sunil Shelke

शिरे येथील रस्त्याचा भूमिपूजन समारंभ संपन्न, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.