व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अनुसूचित जातीच्या नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर पुरवठा योजना, वाचा सविस्तर

मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रुपये 3 लाख 50 लाख हजार राहील.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 17, 2022
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
Tractor

File Image : Tractor


महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांचा पुरवठा करणे ही योजना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे. ( Mini Tractor Supply Scheme To Scheduled Caste Registered Self Help Groups Read In Details )

Novel NIBR Ads

2022-23 या आर्थिक वर्षाकरीता गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी किंवा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे नोंदवलेल्या आणि राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या पात्र बचत गटांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत 3 लाख 15 हजार रुपये मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी केल्यानंतर जमा करण्यात येतात.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे. बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रुपये 3 लाख 50 लाख हजार राहील. नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादा रकमेच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर 90 टक्के शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. ठरवून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल. योजनेअंतर्गत 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटव्हेटर ट्रेलर खरेदी करता येईल.

हेही वाचा – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृतीदिन : बाळासाहेबांच्या आयुष्यातील हे महत्वाचे टप्पे माहितीयेत का?

Novel NIBR Ads

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसहित विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, डॉ. बाबासाहेव आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रोड, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, येरवडा पुणे- 411015 (दूरध्वनी क्र. 020-29706611) येथे पंधरा दिवसाच्या आत प्रत्यक्ष सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त संगीता डावखर यांनी केले आहे. ( Mini Tractor Supply Scheme To Scheduled Caste Registered Self Help Groups Read In Details )

अधिक वाचा –

– महिला, विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत विशेष लक्ष द्या; पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या आढावा बैठकीत चंद्रकांत पाटलांच्या सुचना
– सुमा शिरूर यांच्या रुपाने रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा; राष्ट्रीय पुरस्काराबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष सन्मान


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तब्येत बिघडली, पुढील सर्व कार्यक्रम रद्द

Next Post

मतदार यादीत नाव नसलेले शेतकरीही लढवू शकतात बाजार समितीची निवडणूक; वाचा मंत्रिमंडळाने घेतलेले 15 निर्णय एका क्लिकवर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
CM-Eknath-Shinde

मतदार यादीत नाव नसलेले शेतकरीही लढवू शकतात बाजार समितीची निवडणूक; वाचा मंत्रिमंडळाने घेतलेले 15 निर्णय एका क्लिकवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.