व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव येथील होम मिनिस्टर स्पर्धेत गौरी दरेकर ठरल्या महाविजेत्या ; सत्तर वयापर्यंतच्या महिलांनी घेतला सहभाग । Talegaon Dabhade

प्रसिद्ध निवेदक योगेश सावळे आयोजित ५० महिला स्पर्धकांनी यात सहभाग घेतला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 18, 2024
in लोकल, शहर
home minister competition at Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथील कुंभारवाडा येथे कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून शेतकरी तरुण मंडळ आणि गिरिजात्मक ग्रुप आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा – खेळ पैठणीचा, सन्मान नारीचा हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या स्पर्धेत महिलांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला आणि आपल्या कौशल्यांचे प्रात्यक्षिक सादर केले.

स्पर्धेचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष केदार भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रारंभी उद्घाटन सोहळ्यात व्यासपीठावर भगिनींमध्ये माजी नगरसेविका शोभा भेगडे, भाजपा महिला मोर्चा प्रदेश साचिव ज्योती जाधव, शिल्पा शेलार, अश्विनी भेगडे, शोभा परदेशी, मीना भेगडे आदी मान्यवर उपस्थित होत्या.

उद्घाटन सोहळ्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. प्रसिद्ध निवेदक योगेश सावळे आयोजित ५० महिला स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. उखाणे, रिंग, चेंडू फेकणे, लंगडी, धागा वेचणे अशा वेगवेगळ्या स्पर्धामध्ये शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यासाठी प्रत्येक स्पर्धकांची उडालेली धांदल अन् उत्साह स्पर्धेमध्ये रंगत वाढविणारा ठरला. सोबतीला संगीताचा ठेका अन् उत्साह यामुळे स्पर्धा उत्तरोत्तर रंगतदार ठरली.

पंधरा वर्षांपासून ते सत्तर वर्ष वयापर्यंतच्या स्पर्धक स्पर्धेत होत्या. होम मिनिस्टर स्पर्धा – खेळ पैठणीचा साठी प्रथम क्रमांक मानाची पैठणी, सोन्याची नथ, चांदीचा छल्ला, चांदीचे पैंजण, चांदीचे नाणे अशी बक्षीस ठेवण्यात आलेली. त्याच बरोबर लकी ड्रॉ मधे एल इ डी टीव्ही, मिक्सर, इस्त्री, इडलीचे भांडे, टॉस्टर, डिनर सेट अशी भरघोस बक्षीसे ठेवण्यात आलेली होती.

स्पर्धेत अंतिम फेरीसाठी निवडलेल्या स्पर्धकांमध्ये विजेतेपदाचा मान गौरी दरेकर यांनी पटकावला. तर उपविजेतेपद धनश्री कांबळे यांना देण्यात आले. यावेळी प्रत्येक महिलेस आकर्षक भेट वस्तू आणि ‘लकी ड्रॉ’ स्पर्धेत पहिल्या पाच विजेत्या महिलांना बक्षिसांचे वितरण देखील करण्यात आले. लकी ड्रॉ स्पर्धेच्या अंतर्गत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस भोसले यांना देण्यात आले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी केदार भेगडे आणि दिनेश दरेकर यांनी उत्तम प्रकारे पार पाडली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– औंढे गावातील आदर्श शिक्षिका शांता मंडले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
– साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड, पवनानगर येथे अल्प दरात साखरेचे वाटप । Pavananagar News
– तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील शासकीय संपत्तीवरील पोस्टर, बॅनर हटविण्याचे आवाहन । Talegaon Dabhade


Previous Post

वडेश्वर शाळेतील आदर्श शिक्षिका वनिता राजपूत यांचा खास सन्मान । Vadgaon Maval

Next Post

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात एकूण ८७ लाख ५७ हजार ४२६ मतदार ; शनिवार १९ ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणीची संधी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
New-Voter-Registration

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात एकूण ८७ लाख ५७ हजार ४२६ मतदार ; शनिवार १९ ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.