व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात एकूण ८७ लाख ५७ हजार ४२६ मतदार ; शनिवार १९ ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणीची संधी

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय, सुलभतेने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 18, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
New-Voter-Registration

Photo : New Voter Registration


Dainik Maval News : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ प्रक्रिया पारदर्शक, निर्भय वातावरणात आणि सुलभ, सहजतेने पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज असून राजकीय पक्षांनीही निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे, असे सांगून डॉ. दिवसे म्हणाले, निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध होणार असून त्या दिवसापासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात होणार आहे. नामनिर्देशन दाखल करण्याचा अखेरचा दिवस २९ ऑक्टोबर असून ३० ऑक्टोबर रोजी छाननी होणार आहे. ४ नोव्हेंबर हा उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक असून त्या दिवशी निवडणूक लढविणारे उमेदवार निश्चित होतील. मतदान २० नोव्हेंबर तर मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

ते पुढे म्हणाले, मतदारांना मतदान करण्याचा अनुभव आनंददायी सुखदायी सुलभ व्हावा यावर भारत निवडणूक आयोगाने भर दिलेला असून त्यानुसार जिल्हा निवडणूक प्रशासन काटेकोर काम करेल. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, रॅम्प, ज्येष्ठ मतदार, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर आदी किमान सुविधा करण्यात येणार असून ५ किंवा त्यापेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी रांगांचे व्यवस्थापन, सावलीसाठी मंडप, महिला मतदार, अंध आणि ज्येष्ठ मतदारांसाठी स्वतंत्र रांगा, बालकांसाठी पाळणाघर, वैद्यकीय सुविधा आदी अधिकच्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.

मतदार नोंदणीसाठी १९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची संधी –
पुणे जिल्ह्यात २१ मतदार संघात एकूण ८७ लाख ५७ हजार ४२६ मतदार असून अजूनही नामनिर्देशन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापूर्वी १० दिवसांपर्यंत म्हणजेच १९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज क्रमांक ६ भरून मतदार नोंदणीची संधी आहे. त्यामुळे उर्वरित पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करून घ्यावी, त्यासाठी राजकीय पक्षांनीही आवाहन करावे. जिल्ह्यात ८ हजार ४१७ मतदार केंद्रे असून त्यात ५० ते ६० सहाय्यकारी मतदान केंद्रांची वाढ होऊ शकते, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी आदर्श आचारसंहिता, फिरती सर्वेक्षण पथके (एफएसटी) आणि स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी), निवडणुकीतील पैशाचा वापर, अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू यांची जप्ती यासाठीची यंत्रणा, निवडणूक प्रचारासाठी करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणीकरण, निवडणुकीसाठी केलेल्या व्हीएचए, सी- व्हिजिल, केवायसी, सुविधा पोर्टल आदी संगणकीय व्यवस्था, उपयोजके (एप्लिकेशन्स), महिला, दिव्यांग, युवा संचलित, संकल्पना आधारित विशेष मतदान केंद्रे, आदर्श मतदान केंद्रे आदीबाबत माहिती दिली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– बापूसाहेब.. निर्णय घेऊ नाही, निर्णय घ्या ! विधानसभा लढवायचीये नाही, विधानसभा लढवाच ! काय आहे मावळात चर्चा? नक्की वाचा
– जय मल्हार ग्रुप आयोजित ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाला 900 महिलांची हजेरी, पुजा शिंदे ठरल्या मानाच्या पैठणीच्या मानकरी । Vadgaon Maval
– औंढे गावातील आदर्श शिक्षिका शांता मंडले यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव येथील होम मिनिस्टर स्पर्धेत गौरी दरेकर ठरल्या महाविजेत्या ; सत्तर वयापर्यंतच्या महिलांनी घेतला सहभाग । Talegaon Dabhade

Next Post

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीची ही माहिती प्रत्येक मतदाराला असलीच पाहिजे, नक्की वाचा । Maharashtra Vidhan Sabha Election

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra State Assembly Elections Announced

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीची ही माहिती प्रत्येक मतदाराला असलीच पाहिजे, नक्की वाचा । Maharashtra Vidhan Sabha Election

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.