व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सीआरपीएफ जवान आणि आयटी कर्मचारी दाम्पत्याला मिळाला माऊलींच्या महापूजेचा मान I Kartiki Ekadashi Alandi Wari 2022

कार्तिकी एकादशीनिमित्त आम्ही माऊलींच्या दर्शनासाठी आलो होतो. एकादशी दिवशी आम्हाला महापूजेचा आणि पाहिले दर्शन घेण्याचा मान मिळाला हे आमचे भाग्य आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 20, 2022
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे
Kartiki-Ekadashi-Alandi-Wari-2022

Photo : Dnyaneshwar Phad


तीर्थक्षेत्र आळंदी ( Alandi ) येथील कार्तिक वद्य एकादशी महापूजेचा मान पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील सीआरपीएफ जवान गोरक्ष बाळासाहेब चौधरी (वय 29) आणि आयटी कर्मचारी सविता गोरक्षनाथ चौधरी (वय 25) या दाम्पत्याला मिळाला आहे. यावेळी सीआरपीएफ जवान गोरक्षनाथ यांनी प्रतिक्रिया दिली की, मी सीआरपीएफ सैन्य दलात छत्तीसगड येथे कार्यरत असून सुट्टीनिमित्त गावी आलो होतो. आमचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त आम्ही माऊलींच्या दर्शनासाठी आलो होतो. एकादशी दिवशी आम्हाला महापूजेचा आणि पाहिले दर्शन घेण्याचा मान मिळाला हे आमचे भाग्य आहे. माझे वडील वारकरी आहेत. आई-वडिलांच्या पुण्याईने आम्हाला ही संधी मिळाली. सर्वांना सुखात ठेव असे मागणे माऊलींकडे मागितले. ( Kartiki Ekadashi Alandi Wari 2022 CRPF Jawan And IT Staff Couple Gets Honor Of Mauli Sant Dnyaneshwar Maha Puja )

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

एकादशीला महापूजेसाठी कशी होते भाविक दाम्पत्याची निवड?

एकादशीच्या दिवशी रात्री 12 ते पहाटे 2 यावेळेत 11 ब्रम्हवृन्दाच्या वेदघोषात माऊलींना महापूजा (पावमान अभिषेक व दुधारती) करण्यात येते. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त, प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थ, निमंत्रित उपस्थित असतात. यावेळी महापूजेसाठी एका भाविक दाम्पत्याची निवड करण्यात येते. दर्शनबारीत सर्वात पुढे जे दाम्पत्य असेल त्यांना हा पूजेचा मान मिळतो. गेल्या वर्षी जालना जिल्ह्यातील शेतकरी दाम्पत्याला हा मान मिळाला होता. यावर्षी चौधरी दाम्पत्याला हा मान मिळाला. लाखो भाविकांमधून एका दाम्पत्याची निवड होत असते त्यामुळे भाविक हा मान मिळणे भाग्याचे समजतात.

दरम्यान, रविवार (दिनांक 20) कार्तिकी एकादशी आहे तर मंगळवार (दिनांक 22) माऊलींचा 726 वा संजीवन समाधी सोहळा आहे. 3 लाखापेक्षा अधिक भाविक या सोहळ्यासाठी आळंदीत दाखल झाले आहेत.

Novel NIBR Ads

अधिक वाचा –

– सोशल मीडियाची कमाल; डोंगरगाव परिसरातून बेपत्ता झालेल्या मुलाचा अवघ्या 3 तासात शोध
– वडगाव शहर पाणीपुरवठा योजनेवरुन राजकारण तापलं! ‘अपयश झाकण्यासाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु’, अनंता कुडेंची बोचरी टीका

– वडगावमध्ये काल्याच्या कीर्तनाने कालभैरव जयंती उत्सवाची सांगता


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव शहर पाणीपुरवठा योजनेवरुन राजकारण तापलं! ‘अपयश झाकण्यासाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु’, अनंता कुडेंची बोचरी टीका

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदार बारणे, बाळा भेगडे यांच्याकडून ओझर्डे हेलिपॅडवर स्वागत

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
CM-Eknath-Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदार बारणे, बाळा भेगडे यांच्याकडून ओझर्डे हेलिपॅडवर स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.