व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी ! अवघ्या तीस तासात खुनातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या । Maval Crime

उसनवारीने घेतलेले पैसे परत मागत असल्याच्या कारणावरून मित्रानेच मित्राचा अज्ञात हत्याराने व डोक्यात दगड घालून खून केला असल्याची घटना पवनानगर जवळ घडली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 3, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Accused arrested in Nilesh Kadu murder case at Prabhachiwadi Pavananagar Lonavala Rural Police

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : उसनवारीने घेतलेले पैसे परत मागत असल्याच्या कारणावरून मित्रानेच मित्राचा अज्ञात हत्याराने व डोक्यात दगड घालून खून केला असल्याची घटना पवनानगर जवळील प्रभाचीवाडी, महागाव येथे 31 ऑक्टोबर च्या रात्री घडली होती. एक नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तीन स्वतंत्र टीम तयार करत आणि तांत्रिक तपासाच्या आधारे 30 तासात या घटनेतील मुख्य आरोपी व त्याचे इतर सहकारी अशा तिघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली.

निलेश दत्तात्रय कडू (वय 32 वर्ष, राहणार सावंतवाडी पवनानगर, मावळ) असे या घटनेत खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी व मयत हे दोघेही मित्र आहेत. कामशेत व लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी नोंद असलेल्या गुन्ह्यांमध्ये ते एकमेकांचे सहकारी आहेत. त्यांच्यामध्ये पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाद झाले होते. या वादामधून सदरचा खून झाला असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मुख्य आरोपी अक्षय घायाळ राहणार पवनानगर याला पोलिसांनी तळेगाव येथून ताब्यात घेतले आहे तर त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याच्या अन्य दोन सहकारी यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. 31 ऑक्टोबर रोजी प्रभाची वाडी या ठिकाणी मयत व आरोपी हे चौघेजण नशा पान करण्यासाठी बसले होते त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर अज्ञात हत्याराने निलेश याच्यावर गंभीर स्वरूपाचे वार केले व नंतर दगडाने ठेचून त्याचा खून केला आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, लोणावळा उपविभागाचे पोलीस अधिकारी राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, विजया म्हात्रे व ९ लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तरित्या या घटनेचा तपास करत उपलब्ध माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे हे करत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील महिला आणि तरुणांमध्ये बापूसाहेब भेगडे यांच्या व्हिजनची चर्चा । Bapu Bhegade
– मावळ हादरलं ! ऐन निवडणूकीच्या धामधुमीत भाजपा पदाधिकाऱ्याची दगडाने ठेचून हत्या । Maval Crime
– ‘चिंचवड’च्या राजकारणातून ‘मावळ’वर निशाणा ! सुनिल शेळकेंसाठी अजितदादा मैदानात ? ‘मावळ पॅटर्न’ला उत्तर देणारा ‘चिंचवड पॅटर्न’


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! पवनमावळातील विसापूर किल्ल्यावर सापडले शिवकालीन तोफगोळे । Maval News

Next Post

आमदार सुनिल शेळके यांचा उमेदवारी अर्ज वैध, विरोधकांना भरली धडकी । Maval Vidhan Sabha Sunil Shelke

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Vidhan Sabha Candidate sunil shelke

आमदार सुनिल शेळके यांचा उमेदवारी अर्ज वैध, विरोधकांना भरली धडकी । Maval Vidhan Sabha Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.