व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मी तालुक्यासाठी 4,158 कोटींचा विकासनिधी आणला, तुम्ही निदान 8,000 कोटींचा शब्द तरी द्या’ – आमदार शेळके

ही निवडणूक जनतेच्या विकासाची आहे. महायुतीला मत म्हणजे विकासाला मत होय, असे आमदार शेळके म्हणाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 14, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
MLA Sunil Shelke challenges Bhegad to bring development funds

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मी मावळ तालुक्यासाठी ४,१५८ कोटींचा विकास निधी आणून दाखवला, तुम्ही निदान ८,००० कोटींचा निधी आणण्याचा शब्द तरी मावळच्या जनतेला द्या, असे खुले आव्हान मावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांना दिले. ही निवडणूक जनतेच्या विकासाची आहे. महायुतीला मत म्हणजे विकासाला मत होय, असे आमदार शेळके म्हणाले.

आमदार शेळके यांनी मंगळवारी नवलाख उंब्रे, बधलवाडी, परिटवाडी, जाधववाडी, मिंडेवाडी व सुदुंबरे या गावांचा प्रचारदौरा करीत जनसंवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ठिकठिकाणी वाजत-गाजत मिरवणुकीने, पुष्पवृष्टी करीत, फटाके वाजवून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

परिटवाडीत साडेनऊ कोटींची विकासकामे
परिटवाडीतील विकासकामांसाठी आपण तब्बल साडेनऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले. निवडणुकीनंतर गावच्या मंदिरासाठी देखील भरीव मदत करण्याचा शब्द शेळके यांनी यावेळी दिला. त्यावेळी तुकाराम पापळ, संदीप पापळ, भगवान बदले, सागर जाधव आदी मान्यवरांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाधववाडीत मताधिक्याचा निर्धार
जाधववाडी येथेही आमदार शेळके यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी अर्जुन जाधव, सोसायटीचे अध्यक्ष तानाजी जाधव, उपाध्यक्ष बबन जाधव, प्रसिद्ध गडा मालक किरण जाधव, उद्योजक चंद्रकांत जाधव, ग्रामपंचायात सदस्य गोरख काळोखे तसेच मनोहर जाधव, मुरली जाधव, राजू जाधव आणि महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जाधववाडीत आमदार शेळके यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार उपस्थित ग्रामस्थांनी केला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे शहरात पोलिसांचा रूट मार्च ; मावळ विधानसभेचे प्रमुख उमेदवार तळेगाव शहरात असल्याने विशेष दक्षता
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात ; चालक जागीच ठार । Accident On Mumbai Pune Expressway
– ‘मी कधीही श्रेय घेतलं नाही, विकासकामांचे भूमिपूजन – उद्घाटन देखील ज्येष्ठांच्या महिलांच्या हस्तेच केलंय’ – आ. शेळके


dainik maval jahirat

Previous Post

मावळातील तरूणाईमध्ये बापूसाहेबांच्या व्हिजनची चर्चा ; उच्चशिक्षित तरूणाई भेगडेंच्या प्रचारासाठी मैदानात । Bapu Bhegade

Next Post

‘केवळ मला बदनाम करून तुम्ही ही निवडणूक जिंकू शकत नाही’ : सुनिल शेळके यांचा विरोधकांना टोला

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
mla sunil shelke

'केवळ मला बदनाम करून तुम्ही ही निवडणूक जिंकू शकत नाही' : सुनिल शेळके यांचा विरोधकांना टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.