मुंबई विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धा 2022 या नुकत्याच शहापूर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत खोपोली येथील केएमसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण कामगिरी करत यश संपादन केले आहे.
दिवेश दत्तात्रय पालांडे याने 70 किलो वजनी गटात आक्रमक कुस्ती करत सुवर्ण पदक जिंकले त्याच बरोबर महिलांच्या गटात कु पायल संतोष मरागजे हिने 50 किलो वजनी गटात कौशल्य पूर्ण कुस्तीत सुवर्ण पदक पटकावले. या दोन्ही खेळाडूंची ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी अर्थात राष्ट्रीय स्पर्धे साठी निवड झाली आहे. त्याच बरोबर ओमकार निबळे 86 किलो वजनी गटात झालेल्या अटीतटीच्या लढतीत रोप्य पादक तर रोशनी परदेशी हिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक राजाराम कुंभार, एनआयएस कोच संदीप वांजळे, विजय चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ( Khopoli KMC Collegiate student Divesh Palande Payal Maragje qualified for national competition )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या खेळाडूंचा छोटेखानी सत्कार समारंभ कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलात नुकताच संपन्न झाला. यावेळी खोपोली पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते. त्यांनी मार्गदर्शनपर संबोधन करताना खेळाडूंनी खेळात सातत्य आणि शिस्त ठेवली तर त्यांना उच्चतम कामगिरी करणे सहज शक्य आहे, असे उदाहरणासह विषद केले. तसेच खेळाडूंना आपल्या प्राविण्य पातळीनुसार क्लास वन ऑफिसर होणे शक्य असल्याचे सांगून त्या बाबतीत मोलाचा सल्ला दिला. कुस्तीगीरांना निशुल्क स्वरूपात सर्वसमावेक्षक असे तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाचे संस्थापक अध्यक्ष राजाराम कुंभार, सचिव जगदिश मरागजे आणि इतर पदाधिकारी यांचे कौतुक केले.
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, खालपूर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष डॉ सुनील पाटील, सचिव जगदिश मरागजे, मारुती आडकर सुभाष घासे, दत्तात्रय पालांडे, गुरुनाथ साठेलकर आदी मान्यवरांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! एकविरा देवीचं दर्शन घेऊन निघालेल्या शिक्षकांच्या बसचा मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात अपघात
– माऊलींचे दर्शन घेऊन आळंदीहून पेणला जाणाऱ्या भाविकांच्या बसचा अंडा पॉइंटजवळ अपघात