व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नवीन समर्थ विद्यालयाला रोटरी क्लबकडून वॉटर फिल्टर भेट । Talegaon News

रोटरी क्लब ऑफ तळेगावला 35 वर्षे पूर्ण झाले असून क्लबने आजवर अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 9, 2024
in लोकल, शहर
Gift of Water Filter to New Samarth Vidyalaya from Rotary Club of Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि गोरे सर सैनिक स्कूल मार्गदर्शन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुशीला मुरलीधर गोरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू गजानन गोरे यांच्यातर्फे शनिवारी (दि.7) नवीन समर्थ विद्यालयास वाॅटर फिल्टर भेट देण्यात आला. याप्रसंगी यादवेंद्र खळदे व नवीन समर्थ विद्यालय शालेय समिती अध्यक्ष महेशभाई शहा, रोटरी क्लबचे अध्यक्ष कमलेश कार्ले उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ तळेगावला 35 वर्षे पूर्ण झाले असून क्लबने आजवर अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले आहेत. मुलांचे आरोग्य सदृढ व निरोगी राहावे म्हणून हा उपक्रम केला आहे. मुलांनी त्याचा योग्य वापर करावा व स्वच्छता राखावी, असे यादवेंद्र खळदे म्हणाले.

कमलेश कार्ले यांनी नवीन समर्थ विद्यालयास पुढील काळात सोलर सिस्टिम देण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच समुपदेशन व संमोहन तज्ज्ञ दत्तात्रय गोरे यांनी मुलांसाठी अभ्यास व परीक्षेसाठी आवश्यक असणारे मेडीटेशन व संमोहन सेशन देण्याचा मनोदय व्यक्त केला.

याप्रसंगी प्रमोद दाभाडे, धनंजय मथुरे, चैतन्य कासार, देवेंद्र कदम, निलेश कुमार वाकचौरे, गिरीश जोशी, नवनाथ राठोड, दीपक सूर्यवंशी, ओंकार साळोखे, किरण पवार यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी महेशभाई शहा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्या वासंती काळोखे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन सुनील बोरुडे यांनी केले तर पर्यवेक्षक शरद जांभळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील ‘हे’ गाव आहे संत संताजी जगनाडे महाराज यांचे जन्मगाव, जयंती निमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनकार्य
– तुमच्या आमदाराला दर महिन्याला किती पगार मिळतो ? आमदारांना मिळणारे भत्ते आणि सुविधा वाचून धक्का बसेल
– मावळमधील शिक्षकांनी कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंसमोर मांडल्या समस्या । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

मालमत्ता कराची शंभर टक्के वसुली करण्याचे तळेगाव नगरपरिषदेचे लक्ष्य । Talegaon Nagar Parishad

Next Post

टाकवेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षा तयारी विषयी मार्गदर्शन । Takwe Budruk

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Guidance for study and exam preparation for class 10th students at Takwe Budruk

टाकवेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षा तयारी विषयी मार्गदर्शन । Takwe Budruk

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.