व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 20, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विश्वविजेत्या खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे आणि मावळ तालुक्याचे खास नाते, मावळवासीयांना दुहेरी आनंद । Priyanka Ingale Kho Kho Champion

भारतीय महिला खो-खो संघाने नुकताच पहिला खो-खो विश्वचषक जिंकला. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 25, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Priyanka Ingle captain of world champion Kho-Kho team and Talegaon Dabhade Maval Taluka have special relationship

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : भारतीय महिला खो-खो संघाने नुकताच पहिला खो-खो विश्वचषक जिंकला. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. परंतु मावळवासीयांसाठी ही गोष्ट आणखीन आनंददायी आहे, याचे कारण म्हणजे विश्वविजेत्या महिलांच्या खो-खो संघाची कर्णधार ही तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेची माजी विद्यार्थिनी आहे. भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे ही इंद्रायणी महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी आहे. यामुळे मावळशी तिचे खास नाते आहे.

प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारताने नेपाळ संघाचा अंतिम सामन्यात 38 गुणांच्या फरकाने पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. या यशाबद्दल इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे आधारस्तंभ, माजी आमदार कृष्णराव भेगडे, संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांनी प्रियंका इंगळे आणि भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले.

  • प्रियंका इंगळे ही इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. प्रियंका इंगळे हिचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील असून ती पुण्याच्या पिंपरी-चिंचवड येथील वडमुखवाडी येथे लहानाची मोठी झाली. तिने प्राथमिक शिक्षण श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय, वडमुखवाडी येथे पूर्ण केले, जिथे तिला खो-खो खेळात करिअर करण्याची संधी मिळाली. वयाच्या बाराव्या वर्षापासून प्रियंकाने राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. सातवीत असतानाच तिने तिच्या कारकिर्दीतील पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळली होती.

प्रियंका हिने पंधरा वर्षांच्या खेळाडू आयुष्यात तब्बल 23 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. 2023 मध्ये तिने चौथ्या आशियाई खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, तर २०२२ मध्ये तिला राष्ट्रीय स्तरावरील राणी लक्ष्मीबाई पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. प्रियंकाच्या विजयामुळे इंद्रायणी महाविद्यालय आणि मावळ तालुक्याची मान उंचावली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? पाहा संपूर्ण यादी – महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री
– ‘एमएसआयडीसी’कडून तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाचा मसुदा सादर, आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
– मावळच्या विकासासाठी कटिबद्ध, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार – खासदार श्रीरंग बारणे

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

ग्रुप ग्रामपंचायत वरसोलीच्या उपसरपंचपदी अरविंद बालगुडे यांची बिनविरोध निवड । Karla News

Next Post

आमदार सुनिल शेळके यांच्या जनसंवाद यात्रेला वडगावकरांचा प्रतिसाद, नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MLA Sunil Shelke Jan Sanvad Yatra at Vadgaon Maval

आमदार सुनिल शेळके यांच्या जनसंवाद यात्रेला वडगावकरांचा प्रतिसाद, नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala-Gramin-Police

संतापजनक ! पवन मावळ भागातील तिकोणापेठ येथे अल्पवयीन आदिवासी मुलीवर लैंगिक अत्या’चार । Maval Crime

June 20, 2025
Malwandi Thule dam Pavan Maval

पवन मावळ विभागात पावसाचा जोर कायम; मळवंडी ठुले धरण शंभर टक्के भरले, पवना धरण चाळीस टक्क्यांवर

June 20, 2025
Crime

बेडसे गावच्या हद्दीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल । Kamshet News

June 20, 2025
Shirgao Parandwadi Police Station

शिरगावमध्ये पवना नदीकाठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा । Maval Crime

June 20, 2025
Health check-up of students distribution of school supplies at Yelaghol School in Pavan Maval

पवन मावळातील येलघोल शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आणि शालेय साहित्यांचे वाटप । Maval News

June 20, 2025
Publication of annual report of Shri Potoba Devasthan in Vadgaon Maval

वडगाव येथे तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थानच्या पंधराव्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन । Vadgaon Maval

June 20, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.