Dainik Maval News : पवन मावळ भागातील ओवळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रेणुका रामदास वाटाणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायतीच्या मावळत्या उपसरंपच पौर्णिमा भूषण कारेकर यांनी ठरविल्याप्रमाणे कालावधी पूर्ण झाल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त पदासाठी सरपंच दिलीप ज्ञानेश्वर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा गुरुवारी (दि.23) बोलाविण्यात आली होती.
- यावेळी विहित मुदतेत रेणुका रामदास वाटाणे यांचा उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी अविरोध निवड सरपंच दिलीप शिंदे यांनी जाहीर केली. यावेळी ग्रामसेवक जगजीवन मुंडारीया भाऊसाहेब यांनी सभेची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली. रेणुका वाटाणे यांची उपसरपंचपदी निवड जाहीर होताच, त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
यावेळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच पौर्णिमा कारेकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष भालेराव, तुषार साठे, समीर कराळे, सविता भालेराव, भाग्यश्री साठे उपस्थित होते. निवडीनंतर मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच रेणुका वाटाणे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
दरम्यान, रेणुका वाटाणे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सायंकाळी हभप चंद्रकांत महाराज वांजळे यांच्या किर्तनरुपी सेवेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी पंचायत समिती सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी सभापती नंदकुमार धनवे, दत्तात्रय माळी, बाळासाहेब घोटकुले, मनोज येवले आदी मान्यवर उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा ! महाराष्ट्रातील चौदा जणांचा समावेश ; मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री
– महाराष्ट्रातील 48 पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक – पाहा यादी
– महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर, देशात एकूण 49 व्यक्तींना मिळणार पुरस्कार – पाहा यादी