Dainik Maval News : लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर आंबवणे येथे संपन्न झाले. शिबिरात विविध उपक्रम राबविण्यात आले. यात, किल्ले कोराईगड येथे स्वच्छता मोहीम राबवून दुर्गसंवर्धनाचे कार्य करण्यात आले. गावात प्रभातफेरी काढून स्वच्छतेचा जागर करण्यात आला. तसेच व्यसन मुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, लेक वाचवा लेक शिकवा, संविधान जनजागृती संदेश देण्यात आला.
महाविद्यालयाच्या सात दिवसीय शिबिरात, शिबिरार्थी स्वयंसेवकांसाठी राजेंद्र दिवेकर, डॉ. संदिप सोनटक्के, भारत बबन, अपूर्व मराठे, शुभांगी भुजबळ, शिला साने, प्रा. संजय साळुंके या वक्त्यांची व्याख्याने संपन्न झाली. शनिवारी (दि.२२) शिबिराचा निरोप समारंभ पार पडला. याप्रसंगी, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक नंदकुमार वाळंज, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख उपस्थित होते.
- कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. पवन शिनगारे यांनी शिबिराचा अहवाल मांडला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मनोगते मांडली. तदनंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार कथन केले. जीवनात पुढे जात असताना आपल्या आई वडिलांचे उपकार कधीही विसरू नका, असे मार्गदर्शन नंदकुमार वाळंज यांनी केले, तसेच विद्यार्थ्यांनी गावात राबविलेल्या स्वच्छता अभियानाचे कौतूक केले. प्राचार्य डॉ. देशमुख यांनी स्वयंसेवकांना संघटीत राहून कार्य करण्याचे महत्व सांगितले. सरपंच सीता कराडे यांनी स्वयंसेवकांनी गावासाठी केलेल्या कामाचा गौरव केला.
शिबिराचे आयोजन प्रा. धनराज पाटील (कार्यक्रम अधिकारी), प्रा. पवन शिनगारे, प्रा. भूषण गोंदके यांनी केले होते. निरोप समारंभ प्रसंगी उपप्राचार्य विलास पाटील, ऍनि वर्गिस, मुख्याध्यापक भटू देवरे, प्रा. साळुंखे, प्रा. काटकर, प्रा. वर्तक उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा

