Dainik Maval News : पवन मावळातील किल्ले लोहगडावर लोहगड-घेरेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, लोहगड विसापूर विकास मंच यांच्या वतीने परंपरागत पद्धतीने महाशिवरात्र उत्सव यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
- अगोदर महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला भाजे, लोहगड भजनी मंडळ यांच्या वतीने हरिजागर करण्यात आला. लोहगडावरील महादेव मंदिरात अभिषेक करण्यात आला. लोहगड गावातून ढोल ताशांच्या गजरात शिवपालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी रांगोळ्या काढून महिलांच्या वतीने शिवप्रभूंच्या पालखीचे औक्षण करण्यात आले. सुंदर फुलांनी व सडा रांगोळी काढून शिवस्मारक सजावट करण्यात आली होती.
शिववंदनेने शिवस्मारकावर अभिवादन करण्यात आले. यावेळी असंख्य ग्रामस्थ व शिवभक्त उपस्थित होते. शिवघोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता. शिवभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था उद्योजक चंद्रकांत भन्साळी यांच्या वतीने करण्यात आली होती.
नुकतेच, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत लोहगड किल्ल्याला नामांकन प्राप्त झाले आहे. मंच, लोहगड घेरेवाडी ग्रामस्थ व भारतीय पुरातत्व विभाग यांच्या संघटित प्रयत्नातून आज दिमाखात पुन्हा कात टाकून उभा राहिलेला लोहगड आपणास पहायला मिळतो.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा