Dainik Maval News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्याने जन्मदात्या आईला मारहाण केल्याचे समोर आले आहे. आपण मारहाण केली नाही असा दावा सदर पदाधिकाऱ्याने केला होता. मात्र स्वतः आईने माध्यमांसमोर समोर येऊन मुलाचे पितळ उघडे पाडले आहे. मारुती देशमुख असे पदाधिकाऱ्याचे नाव असून ते मावळ तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेल अध्यक्ष आहेत.
आईला मारहाण केल्याचा बनाव रचत माझ्या लहान भावाने राजेंद्र देशमुख याने खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा दावा मारूती देशमुख यानी केला होता. मला अजित पवारांनी पद दिले म्हणून मला बदनाम करण्याचा डाव असल्याचा देखील म्हटले होते. आईच्या अंगावरील कायमस्वरूपी असलेले व्रण दाखवले, तसेच प्रत्यक्षात तिला मारहाण केलीच नाही, असाही दावा केला होता.
- परंतु मारुती देशमुख यानी केलेल्या दाव्यानंतर स्वतः त्यांच्या आईने माध्यमांना आपल्याला मारहाण केली असल्याचे सांगितले व मुलाचे पितळ उघडे केले. मारुती देशमुख व त्याच्या बायकोने आपल्याला मारहाण केली. लाकडी दांड्याने आपल्या पाठीत मारले. यापूर्वी देखील त्याने व त्याच्या बायकोने मारहाण केली आहे. फक्त त्याची बदनामी नको म्हणून मी काही बोलले नाही. मुलाची अब्रू वाचवण्यासाठी मी मूळ गावी आले. पण मुलाने माझा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आईने केला आहे. तसेच या प्रकरणी आता पोलिसांमध्ये तक्रार केल्याची देखील माहिती आईने दिली आहे.
मारुती देशमुख यांच्यावर अजितदादांनी कारवाई करावी, अशी मागणी मारुती यांचे बंधू राजेंद्र देशमुख यांनी केली आहे. आता अजित पवार यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अजित पवार यांनी यापूर्वी देखील त्यांच्या पदाधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. कुठलेही गैरकृत्य खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा पवारांनी दिला आहे. आता मावळातील आपल्याच या पदाधिकाऱ्याच्या कृत्यावर अजितदादा काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा