व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कारवाईचा इशारा मिळताच लोणावळा शहरातील टपरी संघटना आक्रमक ; रस्त्यावर उतरण्याचा निर्धार । Lonavala News

सन २००८ साली लोणावळा शहरामध्ये अतिक्रमण कारवाई राबवित साडेतीनशे टपऱ्या उध्वस्त करण्यात आल्या होत्या.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 28, 2025
in लोकल, शहर
As soon as action was warned Tapri organization in Lonavala city became aggressive

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहरातील जुन्या टपरीधारकांचे पुनर्वसन होईपर्यंत कोणत्याही प्रकारची अतिक्रमण कारवाई लोणावळा नगरपरिषदेला करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा लोणावळा टपरी संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे.

सन २००८ साली लोणावळा शहरामध्ये अतिक्रमण कारवाई राबवित साडेतीनशे टपऱ्या उध्वस्त करण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार या टपऱ्यांचे पुनर्वसन करण्याचे निर्देश लोणावळा नगरपरिषदेला देण्यात आले होते. मात्र त्याप्रमाणे अद्याप जुन्या टपरीधारकांचे पुनर्वसन झालेले नाही. तसेच २०१७ साली लोणावळा शहरातील टपऱ्या, पथारीधारक, हातगाडी धारक यांचा बायोमेट्रिक सर्वे शासनाकडून करण्यात आला आहे. जोपर्यंत या टपरी धारकांचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत आम्ही लोणावळा नगर परिषदेला टपरीधारकांवर कारवाई करू देणार नाही. वेळ पडली तर लोणावळा नगर परिषदेवर मोर्चा काढू, याकरिता लोणावळा शहरातील सर्व टपरीधारकांनी देखील एकत्र येऊन संघर्ष करण्याचा पवित्र घेणे गरजेचे असल्याचे मत लोणावळा शहर टपरी पथारी हातगाडी संघटनेच्या बैठकीमध्ये व्यक्‍त करण्यात आले.

  • लोणावळा शहरातील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्याचा विषय मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. आमदार सुनील शेळके यांच्या आढावा बैठकीमध्ये व तदनंतर लोणावळा नगरपरिषदेने माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या मागणीनुसार लोणावळा नगर परिषद प्रशासनाने घेतलेल्या दुसऱ्या आढावा बैठकीमध्ये देखील माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्याकडून मागील काही वर्षांमध्ये वाढलेल्या टपर्‍यांवर कारवाई करण्याची मागणी
    करण्यात आली होती.

२०१७ नंतर झालेल्या टपऱ्यांवर १० मार्च पर्यंत कारवाई न झाल्यास लोणावळा नगर परिषद इमारतीसमोर टपऱ्या आणून टाकण्याचा इशारा आमदार शेळके यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने देखील कारवाई करण्याच्या मोहिमेची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर लोणावळा टपरी संघटनेच्या वतीने तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत पुढील आठ दिवसांमध्ये लोणावळा शहरांमधील जुन्या व नवीन या सर्व टपऱ्यांची नोंदणी संघटने कडून केली जाणार आहे. नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर टपरी व्यावसायिक, फिरते फेरीवाले व पथारीवाले अशा तीन प्रकारे व्यवसायाचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. लोणावळ्यातील टपरी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्व पक्षीय मंडळींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा 


Previous Post

अजित पवारांच्या मावळातील पदाधिकाऱ्याचे कृत्य ; जन्मदात्रीला केली मारहाण, आईने माध्यमांसमोर येत केले पितळ उघडे

Next Post

लोणावळ्यासह मावळ तालुक्यातील 145 महिलांना मोफत जीडीए नर्सिंग कोर्सचे प्रशिक्षण । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Free GDA nursing course training for 145 women in Lonavala and Maval areas

लोणावळ्यासह मावळ तालुक्यातील 145 महिलांना मोफत जीडीए नर्सिंग कोर्सचे प्रशिक्षण । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.