Dainik Maval News : धुलिवंदनच्या दिवशी वडगाव मावळ येथे झालेल्या दगडी गोटी उचलण्याच्या शिवकालीन मर्दानी खेळामध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते नितीन म्हाळसकर यांनी ३२१ बैठका मारून गतवर्षी सौरभ ढोरे याने केलेला २८५ बैठकांचा विक्रम मोडून नवा विक्रम केला. दरम्यान कुमार गटात विराज वाघवले याने ३०१ बैठका मारून प्रथम क्रमांक पटकावला तर तेजस भिलारे याने १०१ बैठका मारून वरिष्ठ गटात दुसरा क्रमांक पटकावला.
- तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे, विश्वस्त गणेशअप्पा ढोरे, भास्करराव म्हाळसकर, अनंता कुडे, चंद्रकांत ढोरे, तुकाराम ढोरे, क्रीडा प्रशिक्षक सुनील चव्हाण, बिहारीलाल दुबे, सुधीर म्हाळसकर, बापूसाहेब वाघवले, पोलिस निरीक्षक कुमार कदम, शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष अतिश ढोरे, जय बजरंग तालीम अध्यक्ष उमेश ढोरे आदींच्या हस्ते शिवप्रतीमा पूजन व गोटी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी, बाळासाहेब ढोरे, बाबुराव वायकर, विठ्ठलराव भोसले, पंढरीनाथ ढोरे, मनोज ढोरे, राजेंद्र वहिले, अर्जुन ढोरे, अविनाश चव्हाण आदी उपस्थित होते.
याप्रसंगी, कुमार गटात देवेश पाटील याने ६१ बैठका मारून विराज ढोरे याने ५१ बैठक मारून तिसरा क्रमांक पटकावला. यशराज चव्हाण याने ५० बैठका, तुषार नवघणे याने ५० बैठका, यश ओझरकर याने ३७ बैठका, विनीत वहिले याने ३५ बैठका मारल्या. वरिष्ठ गटात पांडुरंग नवघणे याने ३३ बैठका मारून तिसरा क्रमांक पटकावला तर आदित्य आगळमे याने ३२ बैठका मारल्या. याशिवाय मदन भिलारे व सचिन ढोरे यांनी गोटी हातावर धरून अनोखा प्रयत्न केला.
- जय बजरंग तालीम मंडळा च्या वतीने स्व. पै.केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ उमेश ढोरे यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट खेळाडूस चांदीची गदा, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने चांदीचे कडे व राजेंद्र वहिले, अर्जुन ढोरे, विनायक लोकरे, किरण म्हाळसकर यांच्यासह उपस्थितांनी इनाम म्हणून रोख बक्षीस दिले. तसेच कुमार व वरिष्ठ गटातील विजेत्यांना अनुक्रमे अरुण वाघमारे, सुनील दंडेल, अशोक घुले, विकी म्हाळसकर, अमित मुसळे, अतुल ढोरे यांच्या वतीने चषक देण्यात आले तर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने विविध बक्षिसे देण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. जय बजरंग तालीमच्या वतीने पृथ्वीराज मोहोळ यांच्यासह कुस्तीगीर क्षेत्रातील नामवंत पैलवान चंद्रकांत सातकर, संभाजी राक्षे, तानाजी काळोखे, राजाराम पाटील, केतन घारे, भक्ती जांभूळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन सुनील चव्हाण व विकी म्हाळसकर यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध
– मावळात जेई लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार ; 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे केले जाणार लसीकरण । Maval News
– मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News