व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर आमदार सुनिल शेळकेंनी विधानसभेत उठवला आवाज ; मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या…

मावळ तालुक्यातील पवना आणि इंद्रायणी नद्या या येथील जनतेसाठी जीवनदायीनी ठरलेल्या आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 20, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
MLA Sunil Shelke and Pankaja Munde in assembly session

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पवना आणि इंद्रायणी नद्या या येथील जनतेसाठी जीवनदायीनी ठरलेल्या आहेत. परंतु या नद्यांमध्ये अनेक नाल्यांचे पाणी तसेच कारखान्यांतून निघणारे केमिकलयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने या नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहेत. त्यामुळे नद्यांमध्ये फेस दिसू लागला असून जलपर्णीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासंदर्भात आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत आवाज उठवला.

इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी शासनाने ५७७.१६ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. राज्य शासनाने त्यास मान्यता दिली असून तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून ६० टक्के आणि राज्य शासनाकडून ४० टक्के अनुदान मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत विविध गावांमध्ये एसटीपी प्लांट उभारणीचे काम सुरू आहे, मात्र त्याची गती मंद असल्याची त्यांनी तक्रार केली. तसेच नद्यांची स्वच्छता लवकरात लवकर व्हावी यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे उत्तर
पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी या मुद्द्यावर उत्तर देताना सांगितले की, राज्य शासन नदी स्वच्छतेसाठी तातडीने उपाययोजना करत आहे. इंद्रायणी, मुळा-मुठा आणि इतर नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. एसटीपी प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी बैठका घेण्यात आल्या असून, संबंधित विभागांना कार्यवाही करण्यास भाग पाडले जात आहे.

  • मुंडे यांनी नमूद केले की, जलप्रदूषण टाळण्यासाठी महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींची वेगळी कार्यशाळा आयोजित केली जात आहे. तसेच, नद्यांमध्ये प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करण्यासाठी एक नवीन समिती स्थापन केली जाणार आहे. उद्योगांकडून घेतले जाणारे डिपॉझिट वाढवण्याचा विचारही केला जात आहे, जेणेकरून नियम मोडणाऱ्या उद्योगांवर आर्थिक दडपण राहील.

तसेच, पर्यावरण वातावरणीय बदल विभागाच्या मागणी क्रमांकांतर्गत २०२५-२६ च्या आर्थिक वर्षासाठी एकूण ४६७.४३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याचा वापर नदी पुनरुज्जीवन, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरणीय सुधारणा करण्यासाठी केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अर्थसंकल्पात घोषणा होते, पण वर्षानुवर्षे काम होत नाही ; तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकसाठी तातडीने भूसंपादन करा
– तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील अतिक्रमणे ‘पीएमआरडीए’च्या रडारवर ; कारवाईस प्रारंभ
– तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक ; एसीबीच्या पथकाची कारवाई


dainik maval jahirat

Previous Post

वडगावात सोनसाखळी चोरांचा उच्छाद ; तातडीने बंदोबस्त करण्याची व गस्त वाढविण्याची पोलिसांकडे मागणी । Vadgaon Maval

Next Post

आमदार सुनील शेळके यांचे विधानसभेत घणाघाती भाषण ; विविध मागण्यांसाठी सरकारला निर्वाणीचा इशारा । Maval MLA Sunil Shelke

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra Legislative Assembly Budget Session 2025 Speech by Maval MLA Sunil Shelke

आमदार सुनील शेळके यांचे विधानसभेत घणाघाती भाषण ; विविध मागण्यांसाठी सरकारला निर्वाणीचा इशारा । Maval MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.