Dainik Maval News : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाअंतर्गत केंद्र शासनाच्या एन.एस.टी.एफ.डी.सी. नवी दिल्ली पुरस्कृत तसेच राज्य शासन पुरस्कृत योजनेंतर्गत आदिवासी सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना व्यवसायासाठी अल्प व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत असून ७ एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय निहाय घोडेगाव, राजूर, सोलापूर व छत्रपती संभाजीनगर या कार्यालयांना राज्य शासनाचा १६ व केंद्र शासनाचा ३९ लक्षांक प्राप्त झालेला आहे. या योजनेचा लाभ शबरी शाखा कार्यालय जुन्नर कार्यक्षेत्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराधीव, बीड, लातूर या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.
या योजनेंतर्गत स्वयंसहायता बचत गटांना ५ लाख रुपयांचे व्यवसाय कर्ज, ऑटो वर्कशॉप किंवा स्पेअरपार्ट व्यवसायासाठी ५ लाख रुपये, लहान उद्योग व्यवसायासाठी २ लाख रुपये, ऑटो रिक्षा किंवा मालवाहू रिक्षा साठी ३ लाख रुपये, वाहन व्यवसायासाठी १० लाखापासून ते १५ लाख रुपयांपर्यंत व्यवसाय कर्ज अल्प व्याज दरात देण्यात येते. सदर कर्ज योजनेत कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही.
या योजनेचे अर्ज https://mahashabari.in या संकेत स्थळावर भरावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी हे संकेतस्थळ तसेच महामंडळाचे जुन्नर शाखा कार्यालय, महसूल भवन, नवीन बस स्थानकाच्या बाजूला, जुन्नर येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्र. ०२१३२- २९५४७३ ई-मेल आयडी shabarijunnar@gmail.com वर संपर्क साधावा. आदिवासी लाभार्थ्यांनी या कर्ज योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे शाखा व्यवस्थापक राहुल पाटील यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान