व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खडकाळा (कामशेत) ग्रामपंचायतीच्या वाढीव घरपट्टीविरोधात स्वाक्षरी मोहीम ; करवाढीला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी । Kamshet News

कामशेत ग्रुप ग्रामपंचायतीकडून 30 टक्के घरपट्टी वाढविण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 2, 2025
in लोकल, शहर
Even after one year Kamshet Gram Panchayat has not got a full time Gram Vikas Adhikari

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : खडकाळा (कामशेत) ग्रुप ग्रामपंचायतीने केलेल्या घरपट्टी कर वाढीला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांनी केली आहे. तसेच या घरपट्टीवाढीच्या विरोधात शहरामध्ये सह्यांची मोहीम राबविली जात असून आतापर्यंत हजारो नागरिकांनी सही करीत कर वाढीला विरोध दर्शविला आहे.

कामशेत ग्रुप ग्रामपंचायतीकडून 30 टक्के घरपट्टी वाढविण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या या करवाढी विरोधात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत करवाढीला विरोध करीत ग्रामसभेच्या मान्यतेने कर वाढवावा. तत्पूर्वी ग्रामपंचायत 30 ऑक्टोबर 2023 च्या मंजूर ठरावाप्रमाणे वजावाढ वसुली ‘जैसे थे’ करण्यात यावी, 2024-25 करिता वाढीव घरपट्टी वसूल करण्यात आली, त्या पैशांचे समायोजन केले जावे अथवा ते नागरिकांना परत दिले जावेत, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

दरम्यान, कामशेत शहरामध्ये इंद्रायणी कॉलनी, पंचशिल कॉलनी, गणेशवाडी, दत्त कॉलनी, इतर भागात पाण्याचा मोठा प्रश्न आहे. तसेच मंगळवारी बेकायदेशीर हातगाडयांमुळे ट्रॅफीकची समस्या निर्माण होत आहे. ग्रामसभेतील ठरावाची अंमलबजावणीही होत नाही. शहरातील चांगले रस्ते फोडून रस्त्याचे विद्रुपीकरण केले जात आहे, अशा अनेक नागरी समस्या भेडसावत असताना ग्रामपंचायतीने करवाढ केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

कामशेत शहरातील सदनिकांचे 100 टक्के फेरसर्वेक्षण केले जावे, 2024-25 मध्ये किती सदनिकांच्या घरपट्टीत 30 टक्क्यांनी वाढ झाली वा कोणाची झाली नाही तसेच किती सदनिकांची घसाराने घरपट्टी कमी झाली याची यादी प्रसिद्ध करावी, घरपट्टी कोणत्या आदेशाने वाढविली, याची माहिती मिळावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील 560 गोशाळांच्या बँक खात्यात 25 कोटी 44 लाखांचे अनुदान जमा ; तुमची गोशाळा असल्यास ‘असा’ मिळवा योजनेचा लाभ
– दिलासादायक ! राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 555 कोटींची विमा नुकसान भरपाई
– राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणार – मंत्री आदिती तटकरे
– तळेगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल ; श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय । Talegaon Dabhade


Previous Post

किराणा साहित्य आणायला गेलेल्या दुचारीस्वार तरूणाचा मृत्यू ; तळेगाव येथील घटना । Talegaon Dabhade

Next Post

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा परतीच्या मार्गावरील इंदापूर मुक्काम कायम । Dehu News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा परतीच्या मार्गावरील इंदापूर मुक्काम कायम । Dehu News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.