व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी परिवहन खाते विशेष प्रयत्न करणार

अपघात होण्यामागची कारणे शोधून ते टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजनेसाठी प्रयत्न करण्याकरिता प्रत्यक्षपणे ब्लॅक स्पॉटवर उतरून सविस्तर चर्चा केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 30, 2022
in महाराष्ट्र, व्हिडिओ
Mumbai-Pune-Expressway

Photo : Gurunath Sathelkar


मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर होणारी अपघाताची मालिका खंडित होत नसल्याने अपघात रोखण्यासाठी विशेष योजना राबवण्याचे प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून होणार आहेत त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परिवहन उपायुक्त अभय देशपांडे यांनी, उप-प्रादेशिक अधिकारी, पनवेल – अनिल पाटील, पेण – शशिकांत तिरसे, पिपंरी चिंचवड – अतूल आदे, प्रदीप शिनगारे, चंद्रकांत माने, संदीप खोतकर, यांच्या समवेत वाहतूक पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश भोसले आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर यांच्यासोबत एक्सप्रेस वे वरील “ब्लॅक स्पॉट” समजल्या जाणाऱ्या भागांचे सर्वेक्षण केले. ( Transport Department will make special efforts to prevent accidents on Mumbai Pune Expressway )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

अपघात होण्यामागची कारणे शोधून ते टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाय योजनेसाठी प्रयत्न करण्याकरिता प्रत्यक्षपणे ब्लॅक स्पॉटवर उतरून सविस्तर चर्चा केली. याच सोबत मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वर (जुना मुंबई पुणे मार्ग) देखील असलेल्या धोकादायक भागांची पाहणी केली. महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अपघाताच्या वेळी मदतकार्य करताना जाणवणारी प्रमुख कारणे कोणती असतात यांची माहिती घेतली.

वारंवार होणारे अपघात रोखण्याकरीता महामार्गावर आवश्यक ठिकाणी प्रकाश योजना करणे, रिफ्लेक्टर्स लावणे, ब्लॅक स्पॉट समजली जाणारी ठिकाणे वाहन चालकांच्या लक्षात आणून देण्याकरिता विविध सुचना फलक प्रदर्शित करणे, वाहतूक नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करणे इत्यादी विषयांवर अमलबजावणीसाठी तातडीने कार्यवाही केली जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन उपायुक्त अभय देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा – ‘रात्री अपरात्री फोन आला तर नक्की उचला, कदाचित तो फोन मदतीसाठी हाक असेल’

यासाठी उपाय योजना राबविण्याबाबत परिवहन विभागाने “अक्शन प्लॅन” तयार केला असून पुढील सहा महिने त्यावर काम केले जाणार आहे. एक डिसेंबरला याची सुरुवात होणार असून या कालावधीत मुंबई, पुणे, पिंपरी -चिंचवड पनवेल व पेण आरटीओच्या 30 अधिकाऱ्यांची 12 पथके तयार केली असून 24 तास गस्त घालण्यात येणार आहे. ( Transport Department will make special efforts to prevent accidents on Mumbai Pune Expressway )

अधिक वाचा –

– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात! उतारावर अनियंत्रित ट्रकची अनेक वाहनांना धडक, ट्रक 100 फूट दरीत कोसळला, 1 ठार
– सामाजिक भान जपणारा कृतिशील लेखक हरपला, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे 74व्या वर्षी दुःखद निधन । Nagnath Kotapalle Died


dainik maval jahirat

Previous Post

सामाजिक भान जपणारा कृतिशील लेखक हरपला, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे 74व्या वर्षी दुःखद निधन । Nagnath Kotapalle Died

Next Post

व्हिडिओ – अग्निप्रलयापासून थोडक्यात वाचले र. वा. दिघे वाचनालय, वाचा थरार । Khopoli News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Fire-Broke-Out-Khopoli

व्हिडिओ - अग्निप्रलयापासून थोडक्यात वाचले र. वा. दिघे वाचनालय, वाचा थरार । Khopoli News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.