व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ भाजपाचे नूतन कार्यालय तालुक्यात विजयाची मुहूर्तमेढ रोवणारे ठरेल – माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे

वडगाव नगरपंचायतचे स्विकृत नगरसेवक शंकर भोंडवे यांच्या सौजन्याने मावळ तालुका भाजपाच्या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 2, 2022
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Maval-BJP-Office-Vadgaon-Maval

Photo : Ananta Kude


‘मावळ तालुका भाजपाच्या वडगाव येथील मुख्य कार्यालयाचे नूतनीकरण हे आगामी काळात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती-जिल्हा परीषद आणि नगरपरिषदांसह सर्व निवडणुकांमध्ये भाजपाच्या मोठ्या विजयाची मुहुर्तमेढ रोवणारे ठरेल,’ असा विश्वास माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी कार्यालय नुतनीकरण प्रसंगी झालेल्या समारंभप्रसंगी व्यक्त केला. ( Inauguration Of New Office Of Maval Taluka Bharatiya Janata Party At Vadgaon By Bala Bhegde )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वडगाव नगरपंचायत मधील भाजपाचे स्विकृत नगरसेवक शंकर भोंडवे यांच्या सौजन्याने मावळ तालुका भाजपाच्या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून कार्यालयामध्ये जनसंघाच्या स्थापनेपासून भाजपाच्या आजच्या वाटचालीपर्यंतचा प्रवास थोडक्यात मांडण्यात आलेला आहे. याप्रसंगी मा राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे आणि त्यांच्या पत्नी, राजमाता महिला मंचच्या संस्थापक अध्यक्षा सारिका भेगडे यांचे हस्ते श्री सत्यनारायण पूजन करण्यात आले.

हेही वाचा – महत्वाची बातमी! दिनांक 4 डिसेंबर रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन, बेरोजगारांना नोकरींची सुवर्णसंधी

भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचे कौतुक करत येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन यावेळी केले. तसेच मावळ तालुका भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात संघ जनसंघ ते भाजपा या वाटचालीत प्रत्येक कार्यकर्त्यांचे असलेले योगदान अमुलाग्र असल्याचे सांगितले आणि या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. ( Inauguration Of New Office Of Maval Taluka Bharatiya Janata Party At Vadgaon By Bala Bhegde )

ज्येष्ठ नेते शंकरराव शेलार, महिला मोर्चा अध्यक्ष सायली बोत्रे, मावळ तालुक्यातील आजी माजी सभापती, उपसभापती, नगरसेवक, पदाधिकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक, युवा कार्यकर्ते, महिला भगिनी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपाचे वडगाव शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी केले. भाजयुमो अध्यक्ष विनायक भेगडे यांनी आभार मानले.

अधिक वाचा –

– मोठी बातमी! राष्ट्रवादीचं तळेगाव MIDC बंद आंदोलन तात्पुरते स्थगित, ‘आश्वासनांच्या पुर्ततेसाठी सोमवारपर्यंत वाट पाहणार, नंतर…’
– मावळ तालुक्यातील दिव्यांग बंधू-भगिनींसाठी अत्यंत आनंदाची बातमी, नक्की वाचा । Divyang Melava Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! राष्ट्रवादीचं तळेगाव MIDC बंद आंदोलन तात्पुरते स्थगित, ‘आश्वासनांच्या पुर्ततेसाठी सोमवारपर्यंत वाट पाहणार, नंतर…’

Next Post

कान्हे फाट्यावरील भीषण अपघातात ट्रेलर चालकाचा मृत्यू

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Accident

कान्हे फाट्यावरील भीषण अपघातात ट्रेलर चालकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.