Dainik Maval News : राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान वार्षिक परीक्षा २०२५ मध्ये साते गावातील इयत्ता पहिलीतील दोन विद्यार्थी केंद्रस्तरीय यादीत चमकले आहेत. या परिक्षेत स्वरूप भाऊसाहेब मिडगुले याला १५० पैकी १२६ गुण मिळाले. तर देवांशी वदन आगळमे हिला १५० पैकी १२६ गुण मिळाले आहेत.
परीक्षेसाठी गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख निर्मला काळे, शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल दिवाने, मार्गदर्शक शिक्षिका संध्या पोतदार यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक वर्गानेही विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहन दिले. या यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये दहशतवादी कैद? लेकीच्या रिल्समध्ये दोन दहशतवादी कैद झाल्याचा वडिलांचा दावा
– पवनाधरणाच्या जागेवर अवैध बांधकामे ; मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी । Pavana Dam
– लॅपटॉप, संगणक चोरणाऱ्या कामगारास तमिळनाडूमधून अटक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी । Maval Crime