व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडे : ‘जसा आहे तसा रस्ता करून द्या, अन्यथा ठेकेदारावर गुन्हा दाखल करा’ । Talegaon Dabhade

तळेगाव स्टेशन परिसरातील महत्वाचा रस्ता खोदल्यानंतर त्याचे डांबरीकरण न केल्याने तिथे पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता आहे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 16, 2025
in लोकल, शहर
Letter to Nagar Parishad CEO regarding roads Condition in Talegaon Station area

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव स्टेशन परिसरातील महत्वाचा रस्ता खोदल्यानंतर त्याचे डांबरीकरण न केल्याने तिथे पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून जसा आहे तसा करून घ्या, अन्यथा ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, अशा प्रकारचे निवेदन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना सामाजिक कार्यकर्ते मिलिंद अच्युत यांनी दिले आहे.

तळेगाव स्टेशन चौकातील कॅनरा बँकेपासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली. हा महत्वाचा रस्ता अत्यंत वर्दळीचा असूनही त्या ठिकाणी डांबरी रस्त्याची खोदाई केल्यानंतर केवळ माती, दगड टाकून तात्पुरत्या स्वरुपात रस्ता बुजविला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर महत्वाच्या रस्त्यावर अशा प्रकारे राडाराडा फेकल्याने पाऊस पडल्यानंतर चिखलाचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुळात अनेक वर्षांच्या मागणीनंतर दोन महिन्यापूर्वी सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु, नव्याने विकासकामांसाठी हा रस्ता खोदल्याने काही दिवसांपूर्वी रस्ते कामासाठी केलेला खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे सदरच्या रस्त्याचे डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी करण्यात यावे, ही ठेकेदाराची जबाबदारी आहे. ठेकेदाराने जर रस्त्याचे डांबरीकरण केले नाही, तर मुख्याधिकाऱ्यांनी सदर ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, असे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यासह, पावसाळ्याच्या तोंडावर तळेगाव शहरात कुठल्याही प्रकारे खोदाईचे काम करू नये. एकाच रस्त्यावर नागरिकांच्या घामाच्या टॅक्सरुपी पैशाचा अपव्यय होणे योग्य नाही. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरच्या बजेटमधून सदर रस्त्याचे डांबरीकरण करून घ्यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यात ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात ; मावळमधील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत होणार अंमलबजावणी
– ‘नियोजन करून दुपारी दीडची लोकल पुन्हा सुरू’, खासदार श्रीरंग बारणे यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना
– मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
– मोठी बातमी : राज्यातील सर्व देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांची नोंदणी थांबवावी ; महसूलमंत्र्यांचे आदेश


Previous Post

मावळ तालुक्यातील कृषि सहाय्यक बेमुदत संपावर, वाचा काय आहेत मागण्या ? । Maval News

Next Post

चाकण – तळेगाव रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident

चाकण - तळेगाव रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.