व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन

श्री क्षेत्र भंडारा डोंगर हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. डोंगराशी वारकरी संप्रदायाच्या भावना जोडल्या आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 22, 2025
in देश-विदेश, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
bhandara dongar bhandara hill shri kshetra bhandara temple

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : श्री क्षेत्र भंडारा डोंगर हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. डोंगराशी वारकरी संप्रदायाच्या भावना जोडल्या आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग वळविण्यात येईल. डोंगराला बोगदा पाडून हा प्रस्तावित मार्ग करण्यात येणार नसल्याचे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी ही माहिती दिली.

मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सर्व्हे झाला होता. हा प्रस्तावित मार्ग डोंगराला बोगदा पाडून करण्यात येणार होता. याबाबत वारकरी संप्रदायाने चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर खासदार बारणे यांनी भंडारा डोंगर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांच्यासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली. प्रस्तावित मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग वळविण्याची विनंती केली. ही विनंती रेल्वेमंत्री वैष्णव यांनी मान्य केली आहे.

  • प्रस्तावित मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन मार्गासाठी सर्वेक्षण झाला आहे. हा मार्ग श्री क्षेत्र भंडारा डोगर या पवित्र तीर्थक्षेत्रातून एका बोगद्यातून जाणार होता. संत तुकाराम महाराजांचे कर्मभूमी म्हणून हे स्थान संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशभरातील वारकरी संप्रदायासाठी अत्यंत श्रद्धेचे स्थान आहे. वारकऱ्यांच्या भावना डोंगराशी जोडल्या आहेत. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. सध्या १५० कोटी रुपये खर्च करून भंडारा डोंगरावर नागरशैलीत आणि अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या धर्तीवर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे मंदिर उभारण्यात येत आहे. बोगद्याच्या मार्गामुळे या पवित्र स्थानाच्या धार्मिक शांती आणि स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो. भाविक, वारकरी संप्रदाय, ट्रस्टने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रस्तावित बुलेट ट्रेनचा मार्ग किमान दोन किलोमीटर उत्तरेकडे वळवण्यात यावा, अशी मागणी बारणे यांनी निवेदनातून केली होती.

त्यावर रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले, श्री क्षेत्र भंडारा डोंगर हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. मोठे धार्मिक स्थळ आहे. त्यामुळे प्रस्तावित मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन मार्ग डोंगराला बोगदा पाडून करण्यात येणार नाही.

रिंगरोडच्या रेखांकनात बदल ( Pune Ring Road )
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने पुणे जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या तब्बल ११० मीटर रुंद रिंगरोड मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेदून किंवा बोगदा पाडून रस्ता करण्यात येणार होता. त्याला वारकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. हा मार्ग बदलण्यासाठी खासदार बारणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानुसार रिंगरोडच्या रेखांकनात बदल करण्याचे आदेश शिंदे यांनी एमएसआरडीसीला दिले होते. त्यामुळे रिंगरोड भंडारा डोंगराला भेदून किंवा बोगदा पाडून रस्ता करण्याचे टळले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खरीप हंगाम तोंडावर, कृषी सहाय्यक संपावर ! बळीराजा आणि कृषी विभागातील संपर्क तुटला । Maval News
– तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade
– खादी ग्रामोद्योग संघ मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविणार । Maval News
– जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांकडून एकाला बेदम मारहाण ; आंबळे गावातील घटना । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीबाबत आमदार सुनील शेळके संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार । MLA Sunil Shelke

Next Post

सत्ताधाऱ्यांच्या विकासकामांचा बुरखा टराटरा फाडला ! मनसे नेते रुपेश म्हाळसकरांनी दाखविले वडगाव शहराचे खरे वास्तव । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Maval city Sayali Mhalskar MNS leader Rupesh Mhalskar press conference

सत्ताधाऱ्यांच्या विकासकामांचा बुरखा टराटरा फाडला ! मनसे नेते रुपेश म्हाळसकरांनी दाखविले वडगाव शहराचे खरे वास्तव । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.