व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीबाबत आमदार सुनील शेळके संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार । MLA Sunil Shelke

आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजना समितीची पहिली आढावा बैठक संपन्न

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 22, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
first review meeting of Employment Guarantee Scheme Committee was held under chairmanship of MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामांना चालना देण्याच्या उद्देशाने बुधवारी (दि. २१ मे) विधानभवन, मुंबई येथे आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजना समितीची पहिली आढावा बैठक पार पडली. यामध्ये राज्यभरातील कामांचा सखोल आढावा घेऊन प्रलंबित निधी मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या समितीमध्ये अध्यक्ष आमदार सुनील शेळके यांच्यासह एकूण २५ आमदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. समितीच्या कार्यक्षेत्रात सध्या २६६ कामांचा समावेश असून त्यांचे अ, ब, क, ड अशा चार वर्गांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये सिंचन विहिरी, फळबाग लागवड, पानंद व शिवरस्त्यांची सुधारणा ही कामे प्राधान्याने करण्यात येतात.

  • बैठकीत महाराष्ट्र राज्यात योजनेअंतर्गत यापूर्वी करण्यात आलेल्या कामांचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. यामध्ये सुरू असलेली, प्रलंबित असलेली व पूर्ण झालेल्या कामांची देयके यासह विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आगामी काळात समितीच्या माध्यमातून नव्याने हाती घेतल्या जाणाऱ्या प्रकल्पांची रूपरेषा ठरवण्यात आली.

योजनेच्या माध्यमातून विकासकामांसोबतच ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांना रोजगाराच्या माध्यमातून लाभ मिळावा, हेच या समितीचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे आमदार शेळके यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच योजनेच्या अंमलबजावणीबाबत संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा नियोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

  • योजना राबवताना येणाऱ्या अडचणी, निधीची कमतरता आणि इतर प्रश्न यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून प्रलंबित देयके मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ठरले. सदस्य आमदारांनी बैठकीत आपापल्या भागातील अडचणी आणि प्रश्न मांडले असता, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

या बैठकीस समिती सदस्य आमदार शंकर मांडेकर, योगेश टिळेकर, अमोल जावळे, विनोद अग्रवाल, राजेश वानखेडे, शांताराम मोरे, हिकम्मत उढाण, काशिनाथ दाते, संजय देरकर, नितीन देशमुख, शिरीषकुमार नाईक, बापूसाहेब पठारे, किरण सरनाईक, सुधाकर अडवाले यांच्यासह सचिव, आयुक्त, मिशन महासंचालक, सहाय्यक संचालक, उपसचिव व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खरीप हंगाम तोंडावर, कृषी सहाय्यक संपावर ! बळीराजा आणि कृषी विभागातील संपर्क तुटला । Maval News
– तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade
– खादी ग्रामोद्योग संघ मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविणार । Maval News
– जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांकडून एकाला बेदम मारहाण ; आंबळे गावातील घटना । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

येत्या 31 मे पर्यंत बेघर कुटुंबांचे आवास सर्वेक्षण पूर्ण करा ; मावळमधील सर्व ग्रामपंचायतींना बीडीओंच्या सूचना । Maval News

Next Post

मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
bhandara dongar bhandara hill shri kshetra bhandara temple

मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.