व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरात करोडो रुपयांचा कचरा घोटाळा? मनसेच्या आरोपामुळे एकच खळबळ, सखोल चौकशीची मागणी

लोणावळा शहरातील कचरा व्यवस्थापनावरून मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 25, 2025
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Maharashtra Navnirman Sena has alleged major financial scam over waste management in Lonavala city

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहरातील कचरा व्यवस्थापनावरून मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. पत्रकार परिषद घेत मनसे पदाधिकाऱ्यांनी हा आरोप केला आहे.

लोणावळा नगर परिषदेने कचरा संकलन आणि विल्हेवाटीसाठी एका खासगी कंपनीला ९.५४ कोटींचे कंत्राट दिले. या कंत्राटानुसार शहरातील कचरा गोळा करणे, विल्हेवाट लावणे, डेपो व्यवस्थापन, गार्डन देखभाल व सुरक्षारक्षक पुरविण्याची जबाबदारी संबंधित कंपनीकडे होती. मात्र, या व्यवस्थेमध्ये गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप मनसेने केला आहे.

  • मनसेच्या म्हणण्यानुसार, नगरपरिषदेने १४ ऑक्टोबर २०२४ रोजी संबंधित खासगी कंपनीसोबत करार केला. त्यानंतर २० मार्च २०२५ रोजी मुख्याधिकाऱ्यांनी एका ‘बोगस’ भंगारवाल्यासोबत नोटरी करारनामा केला. विशेष म्हणजे, या व्यक्तीचा पत्ता करारनाम्यात वेगळा आणि स्टॅम्प पेपरवर वेगळा नमूद आहे. तसेच, करारनाम्यानुसार ही व्यक्ती हयात नसल्याचे किंवा बोगस असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कलम ९३ नुसार मुख्याधिकाऱ्यांना असा करार करण्याचा अधिकार नसतानाही हा बेकायदेशीर करार केल्याचे मनसेने म्हटले आहे.

मनसेने याप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यात मुख्याधिकाऱ्यांचा बेकायदेशीर करार, भंगारवाल्याची सत्यता, कचरावेचकांना ओळखपत्र नसणे आणि कचरा संकलन करणाऱ्या खासगी कंपनीच्या सुरक्षारक्षकांकडून ऑन ड्युटी असताना गांजा पिणे यासारखा होणारा गैरप्रकार यांचा समावेश आहे. या सर्व प्रकारामुळे नगरपरिषदेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मनसेने सरकारकडे केली आहे.

या पत्रकार परिषदेला लोणावळा शहर मनसे अध्यक्ष निखिल भोसले, रमेश म्हाळसकर, शहर प्रवक्ते अमित भोसले, मधुर पाटणकर, अभिजीत फासगे, संगीता गुजर, दीपमाला बोभाटे, माधुरी साठे, निलेश लांडगे, संदीप बोभाटे, विश्रांत साठे, आकाश लोंढे, सिद्धार्थ कांबळे, साहिल सांडे, जुबेर मुल्ला व मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन


dainik maval jahirat

Previous Post

जमिनीच्या वादातून महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण ; उर्से गावातील घटना । Maval Crime

Next Post

मान्सून काळात आपत्ती उद्भवल्यास निवारणासाठी महाराष्ट्र सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
devendra fadanvis eknath shinde ajit pawar

मान्सून काळात आपत्ती उद्भवल्यास निवारणासाठी महाराष्ट्र सज्ज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.