व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मान्सून काळात आपत्ती उद्भवल्यास निवारणासाठी महाराष्ट्र सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मान्सूनच्या काळात एखादी आपत्ती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यादृष्टीने सर्वच यंत्रणांनी योग्य तयारी केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 25, 2025
in महाराष्ट्र
devendra fadanvis eknath shinde ajit pawar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मान्सूनच्या काळात एखादी आपत्ती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यादृष्टीने सर्वच यंत्रणांनी योग्य तयारी केली आहे. यंदाच्या मान्सूनच्या काळात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी काम करावे. आपत्तीच्या काळात सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी जबाबदारी म्हणून मुख्यालयाच्या संपर्कात राहून 24 तास शनिवार व रविवारीही दक्ष राहून काम करावे. आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिसाद द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मंत्रालयातील परिषद सभागृहात मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

  • आपत्ती निवारण ही आपणा सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद देणे महत्वाचे आहे. त्यासाठीची कार्यपद्धती योग्यरित्या राबवावी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये यंदा 110 ते 119 टक्के पावसाचा आंदाज आहे. जास्ती पावसाचा अंदाज पाहता सांगली आणि कोल्हापूर महानगरपालिकांनी विशेष तयारी ठेवावी. राज्यातील सर्वच महानगरपालिकांनी फ्लॅश फ्लड सारख्या संकटांचा सामना करण्यासाठी आराखडा तयार करावा.
  • राज्यातील दरड प्रवण क्षेत्राचे नव्याने मॅपिंग करणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या घटनांचा विचार करता मॅपिंगमध्ये नसलेल्या ठिकाणीही दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. दरड कोसळण्याच्या जागी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात. यात जिल्हाधिकारी यांनी प्रामुख्याने लक्ष घालावे. मुंबईत दरड प्रवण अशी एकूण 249 ठिकाणे आहेत. याबाबत सर्वच संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. आपत्तीकाळात बचावकार्यासाठी पुरवण्यात आलेल्या साहित्याचे मॉकड्रिल घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून आपण आपत्ती निवारणाचे काम करत आहोत. त्यामुळे त्याच त्या आपत्ती पुन्हा येणार नाहीत यासाठी दक्ष रहावे व तसे नियोजन करावे. जलसंपदा विभागाने धरणांमधील पाण्याच्या विसर्गासाठी आंतरराज्य समन्वय ठेवावा. अशा समन्वयातून पुराचा धोका कमी करण्यास मदत होते. तसेच ज्या ठिकाणी दरड कोसळणे किंवा पूर यामुळे संपर्क तुटतो अशा ठिकाणी रेशनचा अधिकचा साठा पुरवण्यात यावा. तसेच अशा भागातील गर्भवती महिलांना आपत्ती पुर्वीच सुरक्षित स्थळी अथवा रुग्णालयांमध्ये हलवण्यात यावे. जेणेकरून कोणताही अवनस्थ प्रसंग उद्भवणार नाही. विद्युत विभागाने त्यांची सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याचे तपासून घ्यावे, राज्यातील आपत्ती प्रवण भागांचे अद्ययावत नकाशे हवाई दलास द्यावेत, महानगरपालिकेने रस्त्यांची कामे करताना लावलेले आडथळे पावसाळ्यापूर्वी काढून टाकावेत, पश्चिम द्रृतगती मार्गावर ज्याठिकाणी पाणी साठते तेथे दक्षता घेण्यात यावी. धोकादायक इमारतीमधील रहिवाशांचे स्थलांतर करावे अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्यासाठी प्रत्येकाचा प्राण महत्वाचा आहे. सर्व महानगरपालिकांनी नाले सफाई करावी. पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंप बसवावेत, मुंबईत दरड प्रवण भागात डोंगरकड्यांना जाळ्या बसवाव्यात, धोकादायक ठिकाणी फलक लावावेत, पोलिसांनी अशा ठिकाणी जाण्यापासून पर्यटकांना रोखावे अशा सूचना ही त्यांनी केल्या.

आपत्तीकाळात संपर्कासाठी राज्य आपत्ती निवारण विभागाचे संपर्क क्रमांक
पावसाळ्यात विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती निर्माण होत असतात. या आपत्ती निवारणासाठी संपर्क करता यावा यासाठी राज्य आपत्ती निवारण संपर्क क्रमांक दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग आज मान्सून पूर्व तयारीची बैठक संपन्न झाली. हे संपर्क क्रमांक आले.

हे क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत :
संचालक – आपत्ती व्यवस्थापन केंद्र – 9819207435, उप सचिव (एमसीआर) – 8169006195, राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र – 9422560196, लॅन्डलाईन नंबर – 022-220227990, 22794229, 2203 ध्यान (2203023), 9321587143, सॅटेलाईट फोन नंबर – 8991119253 या प्रमाणे आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा शहरात करोडो रुपयांचा कचरा घोटाळा? मनसेच्या आरोपामुळे एकच खळबळ, सखोल चौकशीची मागणी

Next Post

पुणे आणि पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेने पूररेषा नियंत्रित करून अतिरिक्त जागेचा विकास करावा । Pimpri-Chinchwad

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune Pimpri-Chinchwad Municipal Corporation should develop additional land by controlling flood lines

पुणे आणि पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेने पूररेषा नियंत्रित करून अतिरिक्त जागेचा विकास करावा । Pimpri-Chinchwad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.