व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 1, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, चिखलमय रस्त्यांची डागडुजी करा ; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन । Maval News

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे मागणी

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 29, 2025
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Conduct survey of farmers losses repair muddy roads NCP statement to tehsildar Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करा, चिखलमय रस्त्यांची डागडुजीकरण करा, अशी मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारकडे केली आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार मावळ, विक्रम देशमुख यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले आहे.

nakshtra ads may 2025

याप्रसंगी पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, ओबीसी सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, युवक तालुकाध्यक्ष विशाल वहिले, महिला तालुकाध्यक्ष जयश्री पवार, माजी सरपंच कैलास खांडभोर, सोमनाथ धोंगडे, बारकू ढोरे, दत्तात्रय आंद्रे, सुरज पुरी, संतोष देशमुख आदी उपस्थित होते.

tata tiago ads may 2025

काय आहे निवेदन?
मागील आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे उन्हाळी भुईमूग, बाजरी आणि बागायती भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी बाजरीचे पीक आले असताना देखील काढता आले नाही, त्यामुळे मोठे नुकसान शेतकऱ्याला सोसावे लागले आहे. तसेच भुईमूग पिकाला पावसामुळे शेतात वापसा नसल्यामुळे काढता येत नाही. काही ठिकाणी शेंगांना मोड येऊ लागले आहेत.

खरीप भात पिकाच्या तयारीच्या कामाला खीळ बसली असून शेतकऱ्यांसमोर भात रोपे कशी तयार करायची याची चिंता लागून राहिली आहे. पशूधनाचे देखील नुकसान झाले आहे, तरी त्या नुकसानाचे त्वरित पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच खरीप पेरणीसाठी बियाणे व खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये, बोगस बियाणांची विक्री होऊ नये यासाठी ताबडतोब उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

खराब रस्त्यांची डागडुजी करा
वडेश्वर ते शिंदे घाटेवाडी पर्यंत रस्ता हा संपूर्ण चिखलमय झाला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील इतर रस्ते देखील खराब झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते. यासंबधी संबंधितांना डागडुजीकरण करण्यास ताबडतोब आदेश द्यावेत, असे निवेदन मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन


dainik maval ads may 2025

Previous Post

साते येथील यशवंत ग्रामीण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब आगळमे, तर कार्यकारी संचालकपदी भारत काळे यांची निवड

Next Post

मावळ तालुक्यात पावसाचा जोर ओसरला ! नांगरट आणि पेरणीसाठी चांगल्या उन्हाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
intensity of rains has subsided in Maval taluka Farmers are waiting for good summer for sowing

मावळ तालुक्यात पावसाचा जोर ओसरला ! नांगरट आणि पेरणीसाठी चांगल्या उन्हाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drunk driver runs over MPSC students in Pune twelve injured CM Fadanvis takes note

मोठी बातमी : पुण्यात मद्यपी वाहन चालकाने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना उडवले, बारा जण जखमी, मुख्यमंत्र्यांकडून दखल । Pune News

May 31, 2025
Accident

ताजे गावाजवळ भीषण अपघात ! पिकअपचे पंक्चर काढत असलेल्या दोघांना भरधाव वाहनाने चिरडले, दोघांचा जागीच मृत्यू

May 31, 2025
MLA Sunil Shelke take review meeting at Lonavala Municipal Council Anger on officials

नागरिकांना वेळ द्या, त्यांचे प्रश्न सोडवा ; लोणावळ्यातील आढावा बैठकीत आमदार शेळके यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी । Lonavala News

May 31, 2025
Seventeen year old boy drowned in Valvan dam Lonavala

मित्रांसोबत फिरायला आलेल्या सतरा वर्षीय निलेशचा वलवण धरणात बुडून मृत्यू । Lonavala News

May 31, 2025
Former students of Pavana Vidya Mandir came together again after 27 years valuable help to school

पवना विद्या मंदिरचे माजी विद्यार्थी २७ वर्षांनी पुन्हा आले एकत्र ; शाळेला केली मोलाची मदत । Pavananagar News

May 31, 2025
Balasaheb Masurkar elected as president of Kothurne Society Pavan Maval

कोथुर्णे कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब मसुरकर यांची निवड । Pavan Maval

May 31, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.