व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनील शेळके यांच्याकडून लोणावळा शहरातील विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी; कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना । Lonavala News

आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा शहरातील विविध महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 31, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
MLA Sunil Shelke inspects development works in Lonavala city Instructions to complete works on time

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा शहरातील विविध महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व सुरक्षाविषयक गरजांशी संबंधित असलेल्या या प्रकल्पांची गती वाढवून नागरिकांना अधिक सक्षम व दर्जेदार सुविधा मिळाव्यात, हा या दौऱ्यामागचा उद्देश असल्याचे आमदार शेळके यांनी स्पष्ट केले.

दौऱ्यात त्यांनी खालील प्रमुख ठिकाणांना भेट देऊन कामाची सद्यस्थिती जाणून घेतली:
1. ग्रामीण पोलीस स्टेशन, तुंगार्ली – नवीन इमारतीचे काम लवकर पूर्ण होऊन ग्रामीण भागातील सुरक्षेसाठी सक्षम व्यवस्था निर्माण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
2. पांगळोली शासकीय इमारत – गावपातळीवर शासकीय सेवा पोहोचवण्यासाठी या इमारतीचे महत्त्व अधोरेखित करत कामाला वेग देण्याचे निर्देश दिले.
3. खंडाळा गावातील शाळेची जागा – गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रस्तावित शाळेच्या जागेची पाहणी करण्यात आली.
4. लोणावळा शहर पोलीस स्टेशनची नवीन इमारत – शहराच्या वाढत्या गरजांनुसार तांत्रिकदृष्ट्या सक्षम पोलिस यंत्रणा निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
5. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक – या प्रेरणादायी स्मारकाच्या कामाला ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व असल्याचे सांगत लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचे आवाहन.
6. कन्याशाळा, भांगरवाडी – जीर्ण झालेल्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी तातडीची कार्यवाही गरजेची असल्याचे मत व्यक्त केले.
7. उपजिल्हा रुग्णालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक – आरोग्य व सामाजिक समतेचे प्रतीक असलेल्या या प्रकल्पांच्या कामांची प्रगती तपासण्यात आली.

या दौऱ्यानंतर लोणावळा नगरपरिषद कार्यालयात सर्व संबंधित अधिकारी, अभियंते आणि प्रशासकीय प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी प्रत्येक प्रकल्पावरील कामाची सद्यस्थिती, येणाऱ्या अडचणी, निधीची स्थिती आणि पूर्णत्वासाठी लागणारा कालावधी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! पुणे ग्रामीण जिल्ह्यात 13 जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली । Pune News

Next Post

कोथुर्णे कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब मसुरकर यांची निवड । Pavan Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Balasaheb Masurkar elected as president of Kothurne Society Pavan Maval

कोथुर्णे कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब मसुरकर यांची निवड । Pavan Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.