Dainik Maval News : लोणावळा शहर व ग्रामीण हिंदू समितीच्या वतीने ३५२वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
- शिवप्रेमींच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शिवनामाचा जयघोष करण्यात आला. यावेळी महाराजांच्या पुतळ्यास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
दरवर्षी दुर्गराज रायगड या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. यानिमित्त समितीचे सदस्य रमेश व्यास व मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गराज रायगड या ठिकाणी शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. मावळातील शेकडो वारकरी या सोहळ्यात उत्साहात सहभागी झाले.
मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे प्रमुख नंदकुमार महाराज भसे, रामदास महाराज पडवळ, सुभाष महाराज पडवळ आदींसह शेकडो वारकऱ्यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त दिंडीचे आयोजन केले.
या उपक्रमाची माहिती देताना रमेश व्यास म्हणाले, ‘ज्याचे शास्त्र प्रगत, ज्याचं शस्त्र प्रगत, त्याचं राष्ट्र प्रगत या उक्तीप्रमाणे वारकरी विद्यार्थी, त्याचबरोबर वारकरी भक्तांना केवळ वारकरी पद्धतीनेच नव्हे तर धारकरी पद्धतीने सुद्धा प्रशिक्षण देणे हे काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे शौर्य अतुल्यनीय आहे. या ज्वलंत इतिहासाची प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी घडावे आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुणपणातच चांगला सत्संग धरावा. यासाठी अशा उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असल्याचे व्यास म्हणाले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश