व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरात छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा थाटामाटात साजरा । Lonavala News

विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 7, 2025
in लोकल, शहर
Chhatrapati Shivaji Maharaj coronation day celebrated with pomp in Lonavala Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहर व ग्रामीण हिंदू समितीच्या वतीने ३५२वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Novel NIBR Ads

  • शिवप्रेमींच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शिवनामाचा जयघोष करण्यात आला. यावेळी महाराजांच्या पुतळ्यास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

दरवर्षी दुर्गराज रायगड या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. यानिमित्त समितीचे सदस्य रमेश व्यास व मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गराज रायगड या ठिकाणी शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. मावळातील शेकडो वारकरी या सोहळ्यात उत्साहात सहभागी झाले.

मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे प्रमुख नंदकुमार महाराज भसे, रामदास महाराज पडवळ, सुभाष महाराज पडवळ आदींसह शेकडो वारकऱ्यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त दिंडीचे आयोजन केले.

या उपक्रमाची माहिती देताना रमेश व्यास म्हणाले, ‘ज्याचे शास्त्र प्रगत, ज्याचं शस्त्र प्रगत, त्याचं राष्ट्र प्रगत या उक्तीप्रमाणे वारकरी विद्यार्थी, त्याचबरोबर वारकरी भक्तांना केवळ वारकरी पद्धतीनेच नव्हे तर धारकरी पद्धतीने सुद्धा प्रशिक्षण देणे हे काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे शौर्य अतुल्यनीय आहे. या ज्वलंत इतिहासाची प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी घडावे आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तरुणपणातच चांगला सत्संग धरावा. यासाठी अशा उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असल्याचे व्यास म्हणाले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

लाडक्या बहिणींनो बँक खाते तपासा… मे महिन्याचे दीड हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरूवात । Mazi Ladki Bahin Yojana

Next Post

लोहगड किल्ल्यावर भूस्खलन, भाजे गावाकडील काही भाग कोसळला ; सुदैवाने जीवितहानी नाही । Lohgad Fort News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Landslide at Lohagad Fort Pune District Maval Taluka

लोहगड किल्ल्यावर भूस्खलन, भाजे गावाकडील काही भाग कोसळला ; सुदैवाने जीवितहानी नाही । Lohgad Fort News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.