व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लाडक्या बहिणींनो बँक खाते तपासा… मे महिन्याचे दीड हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरूवात । Mazi Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे 2025 महिन्याचा हप्ता कधी येणार, असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. Ladki Bahin Yojana May 2025 Installment

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 7, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, देश-विदेश, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर, शहर
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे 2025 महिन्याचा हप्ता कधी येणार, असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून या योजनेतील सन्माननिधीच्या वितरणाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले असून आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेत की नाही हे तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भातील एक्सवर माहिती दिली आहे. ( Ladki Bahin Yojana May 2025 Installment )

एप्रिल महिन्याचा हप्ता गुढीपाडव्यापासून देण्यात आला होता. त्यामुळे मे महिन्याचाही हप्ता मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, मे महिना उलटला तरीही हप्ता खात्यात जमा न झाल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली. त्यातच, छाननी प्रक्रिया सुरू झाल्याने आपलाही अर्ज बाद झाला की काय अशी शंका अनेक पात्र महिलांना वाटू लागली. दरम्यान, जानेवारी महिन्यापासून अनेक पात्र महिलांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यामधून जवळपास लाखो सरकारी कर्मचारी महिलांचे अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. तर, विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही अपात्र करण्यात आलं आहे. या छाननी प्रक्रियेतून यशस्वी ठरलेल्या पात्र महिलांच्या खात्यात आता दीड हजार रुपये जमा केले जात आहे.

गेल्यावर्षी जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्याचे आश्वासित करण्यात आले. त्यानुसार, ऑगस्ट महिन्यापासून हा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. ऑक्टोबर महिन्यापर्यंत सरकारने या योजनेसाठी महिलांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आणि पात्रही झाले. एप्रिल महिन्यापर्यंत महिलांना १० हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत, तर मे महिन्याचा ११ वा हप्ताही महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या…

— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) June 4, 2025

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश


Previous Post

पुसाणे येथील दारूभट्टीवर छापा, आठ हजार लिटर रसायन नष्ट । Maval Crime

Next Post

लोणावळा शहरात छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा थाटामाटात साजरा । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chhatrapati Shivaji Maharaj coronation day celebrated with pomp in Lonavala Maval

लोणावळा शहरात छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा थाटामाटात साजरा । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
Big relief for Talegaon Dabhade residents regarding water issue Approval for reservation of water from Andhra Dam

तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी

April 16, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.