व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहूरोड खून प्रकरणातील आरोपीला 24 तासात अटक ; पोलिसांनी गुजरातच्या वडोदरातून घेतले ताब्यात । Maval Crime

देहूरोड येथील थॉमस कॉलनी जंगल परिसरात एका अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 14, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
crime-arrested

File Photo


Dainik Maval News : देहूरोड येथील थॉमस कॉलनी जंगल परिसरात एका अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केली आहे. खूनाची ही घटना गुरुवारी (दि. १२) पहाटे उघडकीस आली होती. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडला होता. गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट पाचने गुजरात राज्यातून अटक केली आहे.

  1. सनीसिंग राजीवसिंग राजपूत (वय १९, रा. शिवान, बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दिलीप मोरिया (वय १६) असे खून झालेल्या तरुणाचे नावे आहे. अरुण मोरिया (वय १४) हा जखमी झाला आहे. अरुणने गुरूवारी (दि. १२) याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे फाटा येथील एका तरुणीचे दिलीप याच्यासोबत प्रेमासंबंध होते. त्याच तरुणीचे सनी सिंग याच्यासोबतही प्रेम संबंध होते. तीन महिन्यांपूर्वी दिलीप आणि सनी या दोघांचे या कारणावरून भांडण झाले होते. बुधवारी रात्री दिलीपने चुलत भाऊ अरुणला फोन करून थॉमस कॉलनी जवळ जंगल परिसरात बोलावून घेतले. तिथे सनी सिंग आणि दिलीप याचे भांडण झाले.

  • भांडण सोडविण्यासाठी अरुण मध्ये पडला. तेव्हा सनीने अरुणवर चाकूने हल्ला केला. अरुण जखमी अवस्थेत थॉमस कॉलनीमध्ये आला. त्याने मित्रांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. अरुणला कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र थॉमस कॉलनी जवळील जंगल परिसरात दिलीप याचा शोध लागला नाही.

रात्रभर पोलीस दिलीपचा शोध घेत होते. गुरुवारी पहाटे सव्वा पाच वाजताच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गालगत सर्विस रोडच्या खाली दिलीपचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी सनी सिंग याचा पाठलाग केला. आरोपी वडोदरा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वडोदरा येथे जाऊन सनी सिंग याला अटक केली आहे. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अहमदाबाद विमान दुर्घटना : विमानातील एक प्रवासी बचावला, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती, मृतांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश
– एकीवर दोघांचे प्रेम आणि सोळा वर्षीय मुलाची हत्या… देहूरोड हादरलं ! भेटायला बोलावलं आणि चाकूने भोकसलं । Dehu Road Crime
– आमदार सुनील शेळके यांच्या आदेशानंतर देहू नगरपंचायत प्रशासनाची तातडीने कारवाई ; रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली । Dehu News


Previous Post

‘तू इथे धंदा करायचा नाही’ असे म्हणत रिक्षा चालकाला मारहाण ; शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल । Maval Crime

Next Post

केंद्र सरकारने पोल्ट्री व्यवसायासाठी बनविलेली नियमावली महाराष्ट्रात तातडीने लागू करा ; मावळ पोल्ट्री संघटनेचे निवेदन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Implement regulations made by central government for poultry business in Maharashtra immediately

केंद्र सरकारने पोल्ट्री व्यवसायासाठी बनविलेली नियमावली महाराष्ट्रात तातडीने लागू करा ; मावळ पोल्ट्री संघटनेचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.