व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आषाढी वारी 2025 : माणिक आणि राजा ओढणार संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ ; आप्पाचीवाडी ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण

संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या 340 व्या आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याचे 18 जून रोजी देहूतून प्रस्थान होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 15, 2025
in देश-विदेश, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
Ashadhi Wari 2025 Manik and Raja will pull Palki Rath of Saint Tukaram Maharaj

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या 340 व्या आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याचे 18 जून रोजी देहूतून प्रस्थान होणार आहे. वारीच्या जुन्या अन् पवित्र परंपरेतील एक महत्त्वाचा लक्षवेधी भाग म्हणजे तुकोबारायांची पालखी ओढणारी बैलजोडी. तुकोबांच्या पालखीचा रथ ओढण्याचा मान यंदा सीमाभागातील आप्पाचीवाडी येथील खोत कुटुंबाच्या बैलजोडीला मिळाला आहे.

तुकाराम महाराज यांचा देहूगाव ते पंढरपूर दरम्यान आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यातील रथ ओढण्याचा बहुमान आप्पाचीवाडी (ता. निपाणी) येथील बाबुराव अर्जुन खोत यांच्या माणिक – राजा ह्या बैलजोडीला कायमस्वरूपी लाभला आहे. ह्या बातमीने गावकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले आहे.

  • देहू संस्थांनने ही बैलजोडी खरेदी केली आहे. गावकऱ्यांनी पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून बैलजोडीला देहू संस्थानकडे सुपूर्द केले आहे. अगदी पाहतच राहावा असा पांढरा शुभ्र, अंगाने धिप्पाड, एकसारखा जोडा असणारी ही बैलजोडी गावची शान होती. त्यामुळे बैलजोडीला निरोप देताना खोत कुटुंबासह गावकरी भावनाविवश झाले होते.

पालखी सोहळ्यासाठी बैलजोडी ही तात्पुरत्या स्वरूपात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून घेतली जात होती. मात्र रथ ओढण्यासाठी आपल्याच बैलजोडीला मान मिळावा यासाठी चढाओढ लागत असत. त्यामुळे रथासाठी हक्काची बैलजोडी असावी या उद्देशाने देहू संस्थानने महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागात बैलजोडीची चाचपणी केली, त्यानंतर खोत यांची बैलजोडी पसंत आली व ती खरेदी केली.

आमच्या कुटुंबातील सदस्य असणाऱ्या बैलजोडीला तुकाराम महाराज यांच्या सेवेचा मान मिळाला हे आमचे परम भाग्य आहे. आमच्या कुटुंबीयांनी अगदी आनंदाने ही बैलजोडी देहू संस्थानकडे सोपविण्याचा एकमुखी निर्णय घेतला, असे बैलजोड मालक बाबुराव खोत यांनी सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ ; मावळ तालुक्यातील 24 शाळांचा समावेश
– केंद्र सरकारने पोल्ट्री व्यवसायासाठी बनविलेली नियमावली महाराष्ट्रात तातडीने लागू करा ; मावळ पोल्ट्री संघटनेचे निवेदन
– देहूरोड खून प्रकरणातील आरोपीला 24 तासात अटक ; पोलिसांनी गुजरातच्या वडोदरातून घेतले ताब्यात । Maval Crime
– विकसित कृषी संकल्प अभियान : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले तज्ज्ञांचे मार्गदर्शन । Maval News


Previous Post

मोठी बातमी : लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ; ‘या’ नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Next Post

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वडगावमध्ये सोमवारी महत्वपूर्ण बैठक ; आमदार शेळकेंसह सर्व पदाधिकारी राहणार उपस्थित

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Taluka NCP Meeting concluded at Vadgaon Mahayuti Rally on Saturday

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वडगावमध्ये सोमवारी महत्वपूर्ण बैठक ; आमदार शेळकेंसह सर्व पदाधिकारी राहणार उपस्थित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.