व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कौतुकास्पद ! मावळमधील पिंपळखुटे गावातील शाळेची जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी ; अजित पवारांच्या हस्ते सन्मान

सदर कार्यक्रमात ह्युंदाई इंडिया प्रा. लि. यांच्या वतीने मावळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी देण्यात आलेल्या दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 15, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
Brilliant performance of school in Pimpalkhute village Maval at district level Honored by Ajit Pawar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषदेतर्फे साकारलेल्या “पुणे मॉडेल स्कूल” आणि “स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)” या अभिनव उपक्रमांच्या उद्घाटन समारंभात मावळ तालुक्याचा अभिमान वाढवणारी घटना घडली. पिंपळखुटे (ता. मावळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय यश मिळवले.

या सन्मानाने मावळातील शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या सकारात्मक बदलांचे दर्शन घडले असून, ग्रामीण भागातील शाळाही गुणवत्ता, उपक्रमशीलता आणि स्पर्धात्मकतेच्या बाबतीत पुढे आहेत, हे अधोरेखित झाले.

  • या भव्य कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मावळचे आमदार सुनील शेळके, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवाड, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

सदर कार्यक्रमात ह्युंदाई इंडिया प्रा. लि. यांच्या वतीने मावळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी देण्यात आलेल्या दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवेला प्रत्यक्ष बळ मिळणार आहे.

  • कार्यक्रमात जिल्हाभरातील गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये मावळातील रंजना वाघ (धामणे), सुजाता ताराळकर (उर्से) आणि वैशाली मिसाळ (पुसाणे) यांचा समावेश होता.

पुणे मॉडेल स्कूल ही आधुनिक, समावेशी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्थेची नवी दिशा दर्शवणारी संकल्पना आहे. स्मार्ट क्लासरूम्स, प्रगत विज्ञान प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, करिअर मार्गदर्शन, विद्यार्थिनींसाठी विशेष उपक्रम यांसारखी वैशिष्ट्ये या शाळेचे प्रमुख घटक असणार आहेत.

स्मार्ट मॉडेल पीएचसी मध्ये IPHS मानांकनानुसार दर्जेदार आरोग्य सेवा, HIMS प्रणाली, सौरऊर्जेवर चालणारे हरित आरोग्य केंद्र आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा यांचा समावेश असून, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत नवे मापदंड निर्माण करण्याची क्षमता या केंद्रात आहे.

शिक्षण व आरोग्याच्या क्षेत्रात ग्रामीण भागात घडणारा हा समन्वित विकास ‘पुणे मॉडेल’च्या माध्यमातून उभारला जात असून, ही संकल्पना संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ ; मावळ तालुक्यातील 24 शाळांचा समावेश
– केंद्र सरकारने पोल्ट्री व्यवसायासाठी बनविलेली नियमावली महाराष्ट्रात तातडीने लागू करा ; मावळ पोल्ट्री संघटनेचे निवेदन
– देहूरोड खून प्रकरणातील आरोपीला 24 तासात अटक ; पोलिसांनी गुजरातच्या वडोदरातून घेतले ताब्यात । Maval Crime
– विकसित कृषी संकल्प अभियान : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले तज्ज्ञांचे मार्गदर्शन । Maval News


Previous Post

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वडगावमध्ये सोमवारी महत्वपूर्ण बैठक ; आमदार शेळकेंसह सर्व पदाधिकारी राहणार उपस्थित

Next Post

मोठी बातमी : मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
मोठी बातमी : मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती

मोठी बातमी : मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.